आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात दंगल:39 पैकी 12 आराेपींचा मृत्यू ; हत्या, अत्याचार प्रकरणी 27 आराेपींची सुटका

पंचमहाल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या एका न्यायालयाने २००२ च्या भीषण जातीय दंगलीदरम्यान कालाेलमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांत अल्पसंख्याक समुदायातील १२ हून जास्त सदस्यांची हत्या व सामूहिक अत्याचार प्रकरणातील सर्व २७ आराेपींची पुराव्याअभावी सुटका केली आहे. या प्रकरणांत ३९ आराेपी हाेते. २० वर्षे चाललेल्या खटल्यात १२ आराेपींचा मृत्यू झाला हाेता. त्यांच्याविराेधातील खटला संपुष्टात आला. पंचमहाल जिल्ह्यातील हालाेलच्या न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. २७ फेब्रुवारीला गाेध्रा येथे साबरमती रेल्वे पेटवून दिली हाेती. त्या घटनेनंतर १ मार्च २००२ राेजी भडकलेल्या जातीय दंगलीत उग्र झालेल्या गर्दीचा हे आराेपी एक भाग हाेते.जमावाने समूहाला लक्ष्य केले आणि त्यापैकी ११ जणांना जिवंत जाळले. एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाला हाेता. पाेलिसांनी या प्रकरणात ४८ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल केला हाेता.