आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 12 People Missing Ganga River Pathna Rescue Operation By SDRF Started; The Incident Happened With The Flow Of Water Patna |

50 जणांनी भरलेल्या दोन बोटी गंगा नदीत धडकल्या:12 जण बेपत्ता, एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू; वेगवान प्रवाहामुळे घडली घटना

पाटणा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगा नदीत 50 जणांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाल्याने दोन्ही बोटी पाण्यात उलटल्याची घटना पाटणा येथे घडली आहे. बोटीमध्ये असलेले सर्वजण नदीत बुडाले. यातील बहुतांश लोकांना नदीतून बाहेर काढण्यात यश आले असून अद्याप 12 जण बेपत्ता आहेत. एसडीआरएफची टीम त्यांचा शोध घेत आहे. गंगेच्या जोरदार प्रवाहामुळे दोन्ही बोटींचे संतुलन बिघडल्याने ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहपूर पोलिस ठाणे हद्दीतील शेरपूर घाटात रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी याची माहिती शाहपूर पोलिस स्टेशन आणि एसडीआरएफ टीमला दिली. यानंतर गंगा नदीत बचावकार्य सुरू करण्यात आले.

परतत असताना घडली घटना
एसडीआरएफला घटनेची माहिती मिळताच त्यांनी बचावकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते, त्यात ग्रामस्थांनी देखील मदत केली. शाहपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाऊदपूर येथील रहिवासी असलेले सुमारे 50 लोक बोटीने पशुखाद्य म्हणजेच चारा घेऊन परतत होते. त्यादरम्यान, शेरपूर घाटाजवळ गंगेत अचानक पाणी आल्याने दोन्ही बोटींची धडक झाली.

एकही मृतदेह सापडलेला नाही

गावातील लोकांनी शाहपूर पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी पोलिसांची मदत मागितली, त्यानंतर शाहपूर पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी एसडीआरएफ आणि गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. सध्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडलेले नाहीत.

हे आहेत बेपत्ता

शाहपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी शब्बीर आलम यांनी सांगितले की, बोटीवर सुमारे 50 लोक होते. या अपघातात 8 ते 10 जण बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी काही जणांची यादी जाहीर केली आहे.

1. रामधर राम 65 वर्षे

2. कांचन देवी 35 वर्षे

3. भोला कुमारी 12 वर्षे

4. आरती कुमारी 14 वर्षे

5. कुमकुम देवी

6. विनोद राय

7. छोटू राम

8. महेश राम

बातम्या आणखी आहेत...