आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 12 year old Boy Directly In Court To Open School; Focus On The Study, The Judge Said

नवी दिल्ली:शाळा उघडण्यासाठी 12 वर्षीय मुलगा थेट कोर्टात; जज म्हणाले, अभ्यासावर लक्ष द्या

नवी दिल्ली / पवनकुमार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांना अद्याप लस मिळालेली नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही : कोर्ट

कोरोनामुळे दीड वर्षापेक्षा जास्त काळ बहुतांश शाळा बंदच आहेत. यामुळे १२ वर्षांच्या एका मुलाने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून केंद्र व राज्य सरकारांना शाळा उघडण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. त्यावर सोमवारी न्या. डी.वाय. चंद्रचूड व बी.व्ही नागरत्ना यांच्या पीठाने मुलाला सांगितजले की, ‘सध्या अभ्यावरच लक्ष दे. मुलांना अद्याप लस मिळालेली नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही. जेथे स्थिती पूर्वपदावर येत आहे, तेथे राज्य सरकारे शाळा उघडत आहेत.’

कोर्टाने विचारले की, ‘केरळ व महाराष्ट्रात सद्य:स्थितीत शाळा उघडता येतील का?’ न्यायमूर्ती याचिकाकर्त्याच्या वकिलांना म्हणाले, ‘ही याचिका किती चूक आहे, की ती प्रसिद्धीच्या उद्देशाने केली आहे, हे आम्ही सांगत नाही. मात्र मुलांनी अशा नाटकात सहभागी हाेऊ नये.’ यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली. ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही, मुले तणावग्रस्त होत असल्याचे त्याने याचिकेत म्हटले होते.

दिव्यांगांचा मुद्दा : दुसऱ्या प्रकरणात कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे दिव्यांगांच्या लसीकरणासाठीच्या उपाययोजनांवर उत्तर मागितले. ‘इवारा’ संस्थेचे वकील पंकज सिन्हा म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की, कमाल कव्हरेजसाठी घरोघर लसीकरण झाले पाहिजे.

गर्भवतींना लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी
गर्भवती व स्तनदा महिलांना उच्च जोखमीच्या श्रेणीत ठेवणे व लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी झाली आहे. दिल्ली बालहक्क संरक्षण आयोगाने सुप्रीम कोर्टात यबाबत याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. चंद्रचूड यांच्या पीठाने केंद्राकडून २ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...