आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 12 year old Girl's Letter To Modi ; Says Think About Us, In The Future It Will Be Time To Carry An Oxygen Cylinder

12 वर्षीय मुलीचे मोदींना पत्र:आमचा विचार करा, भविष्यात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरण्याची येईल वेळ

हरिद्वार14 दिवसांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पहिल्या आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिनानिमित्त रिद्धिमाने लिहिले पत्र

जगभरात सोमवारी पहिला आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उत्तराखंडातील हरिद्वारची १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती रिद्धिमाने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहिले आहे. रिद्धिमाने पत्रात शुद्ध हवेची मागणी करताना म्हटले, जर आपण आता काही करू शकलो नाही तर एक दिवस सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर लावून फिरण्याची वेळ येणार आहे. ऑक्सिजन सिलिंडर मुलांच्या आयुष्यांचा महत्त्वाचा भाग ठरू नये, तो अाम्हाला खांद्यावर घेऊन चालण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता घ्यावी. हवा आज प्रदूषित इतकी प्रदूषित झाली आहे की, माझ्यासारख्या १२ वर्षांच्या मुलीस श्वास घेण्यास त्रास जाणवतो. मग दिल्ली व अन्य शहरांतील मुलांना किती त्रास सहन करावा लागत असेल, याची चिंता वाटते.

आमचे पंतप्रधान या नात्याने आपण हवामान बदलाचे वास्तव मान्य केले आहे. देशातील सर्व मुलांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाच्या निमित्ताने आमच्या भवितव्याचा विचार करा, असे तिने पत्रात म्हटले आहे.

शुद्ध हवा दिवस साजरा करण्याचा निर्णय गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्रीय संघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. व्यक्ती, समाज कॉपोँरेट व सरकार सर्वांना स्वच्छ व शुद्ध हवेचे महत्त्व पटवून देण्याचा यामागचा उद्देश आहे.

0