आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांमध्ये विभाजन:सरकारसोबतच्या चर्चेपूर्वीच हरियाणाच्या शेतकऱ्यांमध्ये विभाजन, 1.20 लाख शेतकऱ्यांनी केले सरकारचे समर्थन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांनी पाठवलेल्या या पत्रात लिहेल आहे की, नवीन शेतकरी विधेयक मागे घेऊ नये.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 13 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांची सरकारसोबत बुधवारी म्हणजेच एकूण सहावी चर्चा होणार आहे. यापूर्वीच हरियाणाचे शेतकरी दोन गटात विभागले आहेत. 1.20 शेतकऱ्यांनी सरकारला पत्र लिहित शेतकरी कायद्याला समर्थन दर्शवले आहे.

शेतकऱ्यांनी पाठवलेल्या या पत्रात लिहेल आहे की, नवीन शेतकरी विधेयक मागे घेऊ नये. हरियाणाच्या फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशंस (FPOs) संबंधीत शेतकऱ्यांनी असे म्हटले आहे. मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या सल्ल्यांनुसार कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या शेतकरी विधेयकांचा सर्वात जास्त विरोध पंजाब आणि हरियाणातील शेतकरी करत आहे. शेतकरी संघटनांनी कायदा मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. हरियाणा-दिल्ली च्या 6 बॉर्डर आज बंद असणार आहे. 13 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांनी दिल्लीला चहूबाजूंनी घेरले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser