आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविस्थापित काश्मिरी पंडितांना काश्मीरचे मतदार बनवण्यासाठी प्रशासनाकडून अभियान राबवले जात आहे. देशभरात स्थायिक झालेले जवळपास १.२० लाख विस्थापित काश्मिरी पंडितांना काश्मिरात मतदार बनवण्यासाठी २० पथकांची स्थापना केली आहे. मदत व पुनर्वसन संघटनांच्या पथकांनी यापूर्वीच मुंबई, पुणे व चंदीगडचा दौरा केला आहे. आता बंगळुरू, अहमदाबाद व दिल्ली एनसीआरमध्ये जातील. सरकारने प्रथमच काश्मिरी पंडित विस्थापितांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक काश्मिरी पंडित जिथे राहतात तेथील ते मतदार आहेत. जम्मू-काश्मीरचे मतदार म्हणून पात्र होण्यासाठी त्यांना सध्याचा पत्ता असलेले मतदान ओळखपत्र रद्द करावे लागेल. कारण भारतात एक व्यक्ती एका वेळी केवळ एकाच ठिकाणचा मतदार असू शकते, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया २० एप्रिलला पूर्ण होईल. सर्व काश्मिरी पंडितांची काश्मीरचे मतदार म्हणून नोंदणी करण्याची विनंती भाजप निवडणूक आयोगाकडे करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत काही फुटीरतावादी संघटनांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे फर्मान दिल्याने काश्मीरच्या अनेक मतदारसंघांत अत्यंत कमी मतदान झाले होते.
१८ वर्षांच्या नव्या मतदारांचे अर्ज भरून घेतले जात आहेत
अभियानांतर्गत देशातील विविध भागांत राहणाऱ्या १८ वर्षांच्या नव्या काश्मिरी पंडित मतदारांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. भाजपचे प्रवक्ते अजय भारती यांनी सांगितले की, हा काश्मिरी पंडितांना लोकशाहीचा अधिकार देण्याच्या दिशेने मोठा निर्णय आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.