आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विश्लेषण:तब्बल 25 वर्षांनी प्रदीर्घ रिमझिम, ऑगस्टमध्ये प्रथमच 123% पाऊस, मान्सून परतीस 20 दिवस उरले, तोवर 106% पावसाची शक्यता

नवी दिल्ली (अनिरुद्ध शर्मा)5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुखद बातमी : भारतात मान्सूनच्या ८८ दिवसांत ८२% पाऊस

देशात यंदाच्या पावसाळ्यात ८८० मिमी पाऊस सरासरी समजला जातो. पावसाळ्यातील ८८ दिवसांत ७४० मिमी पाऊस बरसला आहे. म्हणजेच सरासरीचा ८१% पाऊस झाला आहे. मान्सूनच्या परतीस अजून २० दिवस आहेत. हवामान खात्यानुसार, हा सिलसिला असाच कायम राहिला तर यंदा सरासरीपेक्षा ४ ते ६% जास्त जाऊस होऊ शकतो. ऑगस्टमध्येच १२३% पाऊस झाला असून तो २५ वर्षांचा उच्चांक आहे. हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, ३, ९, १३, १९ व २४ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो ओडिशापासून सुरू होत छत्तीसगड, महाराष्ट्रमार्गे गुजरातपर्यंत पसरला आहे. हा पट्टा वारंवार तयार होणे व तो मान्सून टर्फसोबत भिडल्याने यंदा अचानक मुसळधार पावसाऐवजी अनेक तास रिमझिम पावसाचा ट्रेंड दिसला आहे. ३६ उपविभागांपैकी फक्त ४ मध्ये कमी पावसाची नोंद पोखरणहून १७ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रारंभ होईल. तो देशभरात १५ ऑक्टोबरपर्यंत थांबेल. हवामान खात्याच्या ३६ उपविभागांपैकी ३२ मध्ये आजवर सरासरी वा त्याहून जास्त पाऊस झाल आहे. चारच उपविभागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ‘ला-नीना’ सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस आणणार हिंदी महासागर डायपोल निगेटिव्ह (जेव्हा महासागराच्या पूर्व टोकाकडे समुद्रतळाचे तापमान पश्चिम टोकाच्या तुलनेत वाढते) झाल्याचा दक्षिण-पश्चिम मान्सूनवर विपरीत परिणाम होतो. मात्र प्रशांत महासागरातील ‘ला-नीना’मुळे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षाही जास्त पावसाची शक्यता कायम आहे. गेल्या ५० वर्षांत फक्त ५ वेळाच मान्सूनमध्ये अतिवर्षाव हवामान खात्यानुसार, मान्सूनमध्ये जेव्हा पाऊस सरासरीच्या ९० टक्के वा त्यापेक्षा कमी होतो तेव्हा मान्सूनची तूट म्हटले जाते. जेव्हा पाऊस ११०% वा त्यापेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला अतिवृष्टीचे वर्ष असे संबोधले जाते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser