आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कचा (एनसीएफ) मसुदा जारी केला आहे. यात १२वी बोर्ड परीक्षा दोन टप्प्यांत घेण्याचा प्रस्ताव आहे. १०वी-१२वीच्या निकालात आधीच्या वर्गातील गुण जोडण्याची शिफारसही केली आहे. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पाहता तयार केलेल्या फ्रेमवर्कमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे विभाजनही संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव आहे. कोरोनाकाळात बोर्ड परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात आल्या. आता हीच व्यवस्था कायम ठेवली जाईल. नवे फ्रेमवर्क २०२४-२५ पासून लागू होईल.
{आतापर्यंत १९७५, १९८८, २००० आणि २००५ मध्ये करिक्युलम फ्रेमवर्क बनले आहे. बोर्ड परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी २००९ मध्ये १०वीसाठी समग्र मूल्यांकन पद्धती लागू केली होती, पण २०१७ मध्ये ती मागे घेण्यात आली.
४ वर्षे-२ टप्पे : ९वी ते १२वीपर्यंत ८ गटांतून निवडावे लागतील विषय
{मसुद्यात अखेरच्या ४ वर्षांत (९वी ते १२वी) विषय निवडण्यात लवचिकता ठेवली जाईल. ते मानव्यशास्त्र, गणित व संगणक, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय अशा आठ विषयांमध्ये विभागण्यात आले आहेत. {ही ४ वर्षेही दोन टप्प्यांत विभागली जातील- ९वी व १०वी आणि ११वी व १२वी. पहिला टप्पा म्हणजे वर्ग ९-१० मध्ये विज्ञान, सामाजिकशास्त्र व मानव्यशास्त्र शिकवले जाईल. दुसऱ्या टप्प्यात (वर्ग ११-१२) इतिहास, भौतिकशास्त्र, भाषाशास्त्र. {९वी-१०वीचा दोन टप्प्यांत विभागणीचा प्रस्ताव नाही. {९वी-१०वीत विद्यार्थ्यांना ८ विषयांपैकी प्रत्येक गटाचे प्रत्येकी २ विषय (१६ विषय) २ वर्षांत शिकावे लागतील. दोन्ही वर्गांची वार्षिक परीक्षा होईल. {तथापि, सेमिस्टर पद्धतीचा पर्यायही असेल. १६ पैकी ८ विषयांचे पेपर पहिले वर्ष म्हणजे ९वी आणि उर्वरित ८ विषयांचे पेपर १०वीत उत्तीर्ण करावे लागतील. १०वीच्या अंतिम प्रमाणपत्रात नववीचे गुणही समाविष्ट केले जातील. {अशाच प्रकारे ११वी व १२वीतही ८ विषय समूहातील चार विषय शिकावे लागतील. या दोन्ही वर्षांत सेमिस्टर पद्धतीने शिक्षण दिले जाईल. निवडलेला विषय एका सेमिस्टरमध्ये पूर्ण करावा लागेल. १२वीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला १६ पेपरमध्ये (कोर्स) उत्तीर्ण व्हावे लागेल. ८ पैकी ३ विषय समूहातून चार विषय निवडावे लागतील. {एखादा विद्यार्थी समाजशास्त्र विषय समूहातून इतिहासाची निवड करत असेल तर त्याला इतिहासाचे चार पेपर (कोर्स) पूर्ण करावे लागतील. गणित गटातून संगणकशास्त्र निवडल्यास ४ कोर्स करावे लागतील.
सीबीएसई :१०वी-१२वी बोर्ड परीक्षेत जास्त विचारले जातील एमसीक्यू
सीबीएसईने मूल्यांकन पद्धतीत बदल करत २०२४ च्या बोर्ड परीक्षांत मल्टिपल चॉइस क्वेश्चन म्हणजेच एमसीक्यू जास्त संख्येत विचारण्याचा, तसेच शॉर्ट व लाँग आन्सर असलेल्या प्रश्नांचे वेटेज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पाहता हे पाऊल उचलले आहे. जेणेकरून विद्यार्थी घोकंपट्टी करणार नाहीत. २०२३-२४ च्या १०वी बोर्ड परीक्षेत एमसीक्यूच्या पेपरमध्ये वेटेज ५०% असेल. तर १२वीत ४०% असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.