आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 12th Grade Marks Are Not Important For Employment, More Jobs In Management Than Science

रिपोर्ट:रोजगारासाठी 12 वीचे गुण महत्त्वाचे नाहीत, सायन्सपेक्षा व्यवस्थापनात अधिक नोकऱ्या

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वुमेन्स इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व ‘ग्रेड’चा अहवाल

एंप्लॉयबिलिटी अँड स्किल्स रिव्ह्यू या अहवालाने सर्व समजांवरील पडदा उचलला गेला की, महानगरांत राहून प्रीमियर संस्थांमध्ये शिकणे तसेच १० वी व १२ वीत जास्त गुण मिळवणे रोजगाराची हमी नाही. या अहवालानुसार, छोटे शहर, गावातील उमेदवारांचे कार्यस्थळावरील प्रदर्शन महानगरातील उमेदवारांच्या बरोबरीने आहे. इंजिनअरिंगच्या (सायन्स) विद्यार्थ्यांच्या तुलनेत व्यवस्थापन, लॉ व ह्यूमिनिटीच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची शक्यता अधिक आहे. कम्युनिकेशन स्किल म्हणजे आपले म्हणणे मांडण्याचे कौशल्य राेजगार मिळवण्याचे एकमात्र कौशल्य नाही, तर संरचनात्मक दृष्टिकोण, काम करण्याची क्षमता आणि मोटिव्हेशन हेही अधिक चांगले कौशल्य आहे, हे स्पष्ट झाले.

वुमेन्स इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि रोजगार व कौशल्याचे विश्लेषण करणारी अंतरराष्ट्रीय संस्था ग्रेड (ग्लोबल रिव्ह्यू, असेसमेंट अँड डिटर्मिनेशन ऑफ एंप्लॉयबिलिटी) ने १०,०४३ विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, उमेदवार आणि नव्या मनुष्यबळाच्या चाचण्या व सविस्तर सर्वेक्षणाच्या आधारावर अहवाल तयार केला आहे. या सर्व्हेमध्ये देशातील सर्वच राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील १०८९ शहरांतील १७७४ संस्था व ६०८४ संस्थांचेे प्रतिनिधी सहभागी होते. नियोक्ता आपल्या भावी कर्मचाऱ्यांत ज्या ११ कौशल्यांची अपेक्षा करतो त्या सर्वांचे या अहवालात विश्लेषण आहे.

नागालँडमध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयबिलिटी
देशात सर्वाधिक एंप्लॉयबिलिटी नागालँडची ६०%. सर्वात कमी मिझोरामची ४४.५% आहे. राष्ट्रीय सरासरी ५४.२२%आहे.

ही १८ राज्ये राष्ट्रीय सरासरीत पुढे: नागालँड, मेघालय, दादरा-नगर हवेली, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, राजस्थान, दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पुद्दुचेरी, केरळ, हिमाचल, म.प्र., ओडिशा, आसाम, लक्षद्वीप, उत्तराखंड.

बातम्या आणखी आहेत...