आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वी उत्तीर्ण मुन्नाभाई एमबीबीएस:चित्रपट बघून सुचली कल्पना, 5 महिने डाॅक्टर बनून नोकरी; तुरुंगातून सुटताच रुग्ण तपासणी

मुरैनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नर्सेसना म्हणायचा, रुग्णाची कागदपत्रे अाणा

मध्य प्रदेशातील मुरैनाच्या अंबाह येथे फसवणुकीचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथे १२ वी उत्तीर्ण तरुण अभ्यासात हुशार नसल्याने डॉक्टर होऊ शकला नाही म्हणून त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट पाहिला आणि डॉक्टर बनण्यासाठी गेला. तसेच बनावट कागदपत्रांच्या मदतीने ताे २०१९ मध्ये मुरैना येथील अंबा हॉस्पिटलमध्ये नोकरीस लागला. पाच महिन्यांनंतर त्याचे रहस्य उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यावर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले. परंतु तुरुंगातून सुटल्यानंतरही त्यांचा डॉक्टर होण्याचा मोह कमी झाला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याचे बनावट अाेळखपत्र घेऊन ताे पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाेहोचला.

डाॅक्टरांच्या मते, त्याने येथे सात दिवस रुग्णांची तपासणीच केली नाही तर वाॅर्डमध्ये जाऊन रुग्णांवर उपचारही करू लागला. नर्सला त्याच्याबद्दल शंका अाल्यावर त्यांनी अन्य डाॅक्टर अाणि अारएमअाे डाॅ. धर्मेंद्र गुप्ता यांच्या कानावर ही गाेष्ट घातली. त्यानंतर अाराेेपी तरुणाला शहर पाेलिसांकडे सुपूर्द करण्यात अाले. तरुणाच्या विराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अाहे. जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर संजय सिंह यांची २०१९ मध्ये मोरेना येथून टिकमगड येथे बदली झाली. त्याच डॉक्टरच्या बदली ऑर्डरची प्रत संजयसिंह माहोर नावाच्या तरुणाने डाऊनलोड केली आणि फेरफार करून ताे ३० मे २०१९ ला अंबा रुग्णालयात नाेकरीवर रुजू झाला. माहोरमध्ये ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांकडील डाॅक्टरांनी दिलेली कागदपत्रे बघून त्यांच्यावर रुबाब झाडायचा, तर कधी ड्यूटीवरील नर्सवर चिडचिड करायचा. याची माहिती अारएमअाे डाॅ. धर्मेंद्र गुप्ता यांना दिली. संजय सिंह महिला वैद्यकीय विभागात गेला अाणि तेथे त्याने नर्सेसकडे रुग्णाचा केस पेपर मागितला. त्यावर नर्सने तातडीने डाॅ. याेगेश तिवारीला बाेलावले. डाॅ. तिवारी यांनी संजय सिंह माहाेरशी चर्चा केली त्या वेळी ताे वैद्यकीय भाषेत उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर अारएमअाे डाॅ. गुप्ता यांना बाेलावले. तपासणी केली असता त्या तरुणाकडे वैद्यकीय अधिकाऱ्याचे बनावट अाेळखपत्र मिळाले. त्यानंतर त्या तरुणाला पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...