आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील बिहार, झारखंड, प.बंगाल आणि ईशान्य राज्यांत नोव्हेंबर महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमान नोंदले आहे. हवामान विभागाच्या १२२ वर्षांच्या नोंदीनुसार, देशासाठी नोव्हेंबर महिना १२ वा सर्वात उष्ण ठरला आहे. गेल्या महिन्यात देशात पाऊसही ३७% कमी नोंदला आणि धुकेही कमी होते. गेल्या महिन्यात देशाचे कमाल, किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे २९.३७ अंश सेल्सियस, १७.६९ अंश सेल्सियस व १७.६९ अंश सेल्सियस व २३.५३ अंश सेल्सियस नोंदले आहे. हे सरासरीपेक्षा जास्त आहे.दुसरीकडे,ईशान्य राज्यांत गेल्या महिन्यादरम्यान दिवसाचे सरासरी तापमान २९.०६ अंश सेल्सियस नोंदले, हे महिन्याचे सरासरी तापमान २७.७९ अंश सेल्सियसपेक्षा १.२७ अंश सेल्सियस जास्त आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये येथे एवढे जास्त तापमान ४३ वर्षांपूर्वी १९७९ मध्ये २९.०४ अंश सेल्सियस नोंदले होते. हे सलग १३ वे वर्ष अाहे, जिथे ईशान्य राज्यांत सरासरी कमाल तापमान अधिक नोंदले आहे. ईशान्य राज्यांमध्ये पाऊसही ९८% कमी झाला. हवामान विभागानुसार, येथे नोव्हेंबरमध्ये सरासरी २२.६ मिमी पाऊस पडतो. मात्र, या वेळी केवळ ०.४ मिमी झाला. याच पद्धतीने मध्य भारतातही(ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड व गुजरात) ९७% कमी पाऊस झाला. नोव्हेंबरमध्ये सामान्यपणे येथे १४ मिमी पाऊस होतो तो घटून ०.४ मिमी झाला.
देशभरात नोव्हेंबरमध्ये सामान्यपणे २९.७ मिमी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी केवळ १८.७ मिमी झाला. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, गेल्या महिन्यात तयार दोन्ही हवामान सिस्टिम कमकुवत राहिल्या. दुसरीकडे, प.विक्षोभाचा जास्त परिणाम जाणवला नाही. त्यामुळे पाऊस कमी पडला.
नोव्हेंबरमध्ये सरासरी कमाल तापमान श्रेणी वर्ष कमाल तापमान 1 2022 29.06 2 1979 29.04 3 1974 28.81 4 2020 28.77 5 2016 28.79
बिनाधुक्याचा नोव्हेंबर हवामान शास्त्रज्ञ आर.के. जेनामणी म्हणाले, सामान्यपणे नोव्हेंबरमध्ये प.विक्षोभांमुळे तापमानात चढ-उतार होतो. मात्र, या वेळी विक्षोभांमुळे १५ दिवसांपर्यंत तापमान ८ ते १३ अंशादरम्यान राहिले. यामुळे रात्री व सकाळच्या वेळी होणारे धुके दिसले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.