आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये यंदा हिवाळ्यात जवळपास बर्फवृष्टी झालेली नाही. मार्चच्या पंधरवड्यापासून सुमारे १३ फूट बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. मार्चच्या सुरुवातीला येथील बर्फाची पातळी ७ फुटांवरून आता २० फुटांपर्यंत वाढली आहे. जोरदार हिमवृष्टीमुळे गौमुख, अलकापुरी आणि पिंडरसह सुमारे१५०० लहान-मोठ्या हिमनद्यांचे पुनर्भरण झाले आहे.
एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत हिमालयाच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टीची शक्यता आहे. मेमध्येही या भागात बर्फवृष्टी हाईल. उत्तराखंडमध्ये हिमनद्यांच्या पुनर्भरणामुळे गंगेच्या मैदानी भागात विशेषत: उत्तर प्रदेश व बिहारसारख्या राज्यांत उन्हाळ्यात पिण्याचे पाणी, सिचंन टंचाई भासणार नाही.
{ उशिरा हिमवर्षाव : वाडिया भूगर्भ संस्थेचे माजी हिमनद्या तज्ज्ञ डी.पी. डोभाल यांच्या मते उशिरा हिमवृष्टीचे कारण म्हणजे हवामान बदलामुळे हिमालयात हिवाळा पुढे सरकला. पूर्वी ऑक्टोबर ते मार्चपर्यंत हिवाळा असायचा. आता डिसेंबर ते मेपर्यंत पुढे जात आहे.
हिमनद्यांच्या पुनर्भरणाचे दोन फायदे
आव्हान : केदारनाथच्या १७ किमी मार्गावर बर्फ साचला
चारधाम यात्रा २२ एप्रिलपासून सुरू होईल. केदारनाथमध्ये सध्या हिमवृष्टी सुरू आहे. गौरीकुंड ते केदारनाथ या १७ किमी रस्त्यापैकी ८ किमीवरील बर्फ ५ एप्रिलपर्यंत हटवला होता. परंतु पुन्हा हिमवृष्टी झाल्याने हा मार्ग झाकला गेला.
1. धरणांत सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी राहणार, वीज उत्पादन प्रभावित होणार नाही
{गाेमुख : भागीरथी नदी येथून उगम पावते. या नदीवरील टिहरी धरणासह तीन मोठी धरणे आहेत.
{अलकापुरी : येथून अलकनंदा नदीचा उगम आहे.
{पिंडर: येथून पिंडारी नदीचा उगम होतो. या दोन्ही नद्या कर्णप्रयागमध्ये जाऊन मिळतात. या नद्यांवर चार धरणे बांधण्यात आली आहेत.
2. उ. प्र. : गंगा नदीवरील सिंचन कालव्यांतून दररोज 10 हजार क्युसेक पाणी सुरू राहणार
उत्तर प्रदेशातील सिंचन कालव्यांद्वारे गंगेतून दररोज १० हजार क्युसेक पाणी सोडले जाते. यासाठी गंगा नदीत २२ ते ३० हजार क्युसेक पाणी असणे गरजेचे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.