आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 13 Killed In Gwalior Bus auto Collision, Including 12 Women Who Went To Cook In Anganwadi

मध्यप्रदेशात भीषण अपघात:ग्वाल्हेरमध्ये बस-ऑटोच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, यामध्ये 12 महिला, अंगणवाडीत स्वयंपाक करण्यासाठी निघाल्या होत्या

ग्वाल्हेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ऑटो आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ऑटो ड्रायवर आणि 12 महिलांचा मृत्यू झाला. सर्व महिला अंगणवाडीत मुलासांसाठी जेवण बनवण्यासाठी जात होत्या. 9 महिला आणि ऑटो ड्रायवरचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन महिलांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

ऑटो ग्वाल्हेरकडून मुरैना रोडवर चमन पार्ककडे जात होता तर बस मुरैनावरून ग्वाल्हेरकडे येत होती. हा अपघात आनंदपूर ट्रस्ट रुग्णालयासमोर झाला. स्थानिक लोकांच्या माहितीनंतर छावणी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

काळाचा घाला
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सर्व 12 महिला दोन ऑटोंमधून जात होत्या परंतु रस्त्यामध्ये एक ऑटो खराब झाला. त्यानंतर खराब झालेल्या ऑटोमधील सर्व महिला दुसऱ्या ऑटोमध्ये बसल्या आणि अपघातामध्ये सर्व महिलांवर काळाने घाला घातला.

बातम्या आणखी आहेत...