आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत भाजपला मोठा धक्का:तामिळनाडूत भाजप आयटी विंगच्या 13 पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजिनामे

चेन्नई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूत भाजपला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई पश्चिममध्ये भाजप आयटी विंगच्या १३ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आयटी सेलचे प्रमुख सीटीआर निर्मलकुमार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्यावर निशाणा साधत राजीनामा दिला.

यानंतर अण्णाद्रमुकचे अंतरिम प्रमुख के. पलानीस्वामी यांची भेट घेतली व त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या १२ इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आणि अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला. अण्णाद्रमुक एनडीएचा सहकारी पक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...