आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 13 Years Old Girl Killed After Rape Two Accused Arrested In Lakhimpur Khiri Uttar Pradesh

अल्पवयीन मुलीसोबत पाशवी कृत्य:13 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करत निर्घृण हत्या, जीभ कापली, डोळेही आले बाहेर, 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत केली अटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हत्येनंतर आरोपींनी मुलीच्या मृतदेहाला उसाच्या शेतात फेकले, शुक्रवारी दुपारपासून ही मुलगी बेपत्ता होती
  • नेपाळच्या बॉर्डरजवळी लखीमपूर खीरीच्या ईसानगर परिसरातील हे प्रकरण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून बलात्कार सिद्ध

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात 13 वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन क्रुर हत्या करण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपींवर राष्ट्रय सुरक्षा कायदा (रासुका)नुसार कारवाई करण्यात आली आहे.

नेपाळच्या बॉर्डरवर ईसानगर परिसरातील ही घटना आहे. मुलीचा मृतदेह शुक्रवारी रात्री उसाच्या शेतात सापडला होता. मुलगी शुक्रवारी दुपारपासूनच बेपत्ता होती. वडिलांचा आरोप आहे की, तपास सुरू केल्यानंतर रात्री उशीरा मृतदेह गावातील एका शेतात सापडला. तिचे डोळे काढण्यात आले होते. जीभही कापण्यात आली होती. तिचा गळा ओढणीने दाबून तिला ओढण्यात आले होते.

बलात्कारानंतर हत्या
धौरहरा सर्किलचे पोलिस अधिकारी अभिषेक प्रताप यांनी सांगितले की, बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्या शेतात मुलीचा मृतदेह सापडला, ते आरोपीचेच शेत आहे. डोळे काढण्याचे वृत्त खोटे आहे. आरोपींवर एनएसएनुसार कारवाई करुन त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

मायावतींचे ट्विट
ही घटना समोर आली यानंतर बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संताप व्यक्त केला आहे. 'यूपीच्या लखीमपुर खीरीच्या पकरिया गावांत दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. हे लाजिरवाणे आहे. समाजवादी पक्ष आणि भाजपा सरकारच्या काळात काय फरक आहे' असा सवाल मायावतींनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी. ही बीएसपीची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...