आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जयपूरच्या जिल्हा न्यायालयाने सिमीच्या 13 सदस्यांपैकी 12 जणांना दहशतवादी घोषित केले आहे. न्यायालयाने या सर्वांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली असून, एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हे सर्व इंजीनिअरिंगचे विद्यार्थ्यी, दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनसाठी काम करायचे. यांना 2014 मध्ये ATS आणि SOG ने अटक केली होती. दहशतवादी घोषित झालेल्या आरोपींपैकी 6 सीकरचे, 3 जोधपूरचे, एक-एक जयपूर, एक पाली आणि एक बिहारमधील गयाचा आहे.
राजस्थानमध्ये सिमीच्या स्लीपर सेलशी संबंधित हे प्रकरण 7 वर्षांपुर्वीचे आहे. दिल्लीमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थानमध्ये ATS आणि SOG पथकांनी 2014 मध्ये जयपुर, सीकर आणि इतर काही जिल्ह्यातील 13 संशयितांना पकडले होते. यांच्यावर आरोप होता की, हे सर्व बंदी घातलेली संघटना सिमीशी संबंधित असून, राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आले होते.
तेव्हा ATS ने दावा केला होता की, सिमीच्या स्लीपर सेलला अॅक्टिव्ह करण्यासाठी जयपुरमधून अटक झालेल्या मारुफचा नातेवाई उमरने इंटरनेटद्वारे यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर हे आरोपी अॅक्टिव्ह होऊन दहशतवादी कारवाया करू लागले. यादरम्यान या सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची मागील सात वर्षांपासून सुनावणी सुरू होती.
या प्रकरणात दोषी करार झालेल्या आरोपींमध्ये यांची नावे
1. मोहम्मद अम्मार यासर मुलगा मोहम्मद फिरोज खान, वय 22 वर्षे, रहिवासी काजी मोहल्ला शेरघाटी, गया (बिहार)
2. मोहम्मद सज्जाद मुलगा इकबाल चौहान (32), अन्जुम स्कूलजवळ, मोहल्ला कुरैशीयान, सीकर
3. मोहम्मद आकिब मुलगा अशफाक भाटी (22), मोहल्ला जमीदारान वार्ड 13, सीकर
4. मोहम्मद उमर मुलगा डॉ. मोहम्मद इलियास (18), जमीदारान वार्ड 2, सीकर
5. अब्दुल वाहिद गौरी मुलगा मोहम्मद रफीक (26), मोहल्ला कुरैशियान, वार्ड 31, सीकर
6. मोहम्मद वकार मुलगा अब्दुल सत्तार (22), मोहल्ला रोशनगंज, वार्ड 13, सीकर
7. अब्दुल माजिद उर्फ अद्दास मुलगा असरार अहमद (21), मोहल्ला जमीदारान वार्ड 12, सीकर
8. मोहम्मद मारुफ मुलगा फारुक इंजीनियर, डी 105, संजय नगर, झोटवाड़ा, जयपुर
9. वकार अजहर मुलगा मोहम्मद तस्लीम रजा, 20 पुराना चूड़ीघरों का मोहल्ला, पाली
10. बरकत अली मुलगा लियाकत अली (28), मकान नं 8, हाजी स्ट्रीट, शान्तिप्रिय नगर, जोधपुर
11. मोहम्मद साकिब अंसारी मुलगा मोहम्मद असलम (25), ए 45, बरकतुल्ला कॉलोनी, जोधपुर
12. अशरफ अली खान मुलगा साबिर अली (40), 653, लायकान मोहल्ला, जोधपुर
मशरफ इकबाल मुलगा छोटू खां (32), नई सड़क, गुलजारपुरा, जोधपुर, याला निर्दोष मुक्त करण्यात आले आङे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.