आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा वेग:अमेरिकेमध्ये तीन महिन्यांत 1.30 कोटी नागरिक बाधित, भारतात 39 लाख रुग्ण

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये लसीकरणाच्या रांगेतील नागरिक. - Divya Marathi
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये लसीकरणाच्या रांगेतील नागरिक.
  • जगात सर्वाधिक रुग्णसंख्या अमेरिकेत, एकूण 2.06 कोटी झाले बाधित

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या २ कोटींहून जास्त झाली आहे. जगाच्या तुलनेत अजूनही अमेरिकेत नव्या रुग्णसंख्येत सर्वात जास्त वेगाने वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांतील आकडे पाहता भारताच्या तुलनेत अमेरिकेत तिप्पट जास्त रुग्ण आहेत. ९० दिवसांत भारतात जवळपास ३९ लाख रुग्ण वाढले. अमेरिकेत याच काळात १.३० कोटी रुग्ण वाढले. एक ऑक्टोबरला भारतात ६३. ९२ लाख व अमेरिकेत ७५.६२ लाख रुग्ण होते. तीन महिन्यांनंतर १ जानेवारीला ही संख्या वाढून भारतात १.०३ कोटी व अमेरिकेत हा आकडा २.०६ कोटी झाला. या काळात भारतात मृत्युसंख्या सुमारे ४९ हजारांनी वाढली, तर अमेरिकेत मृत्यू १.४३ लाखावर गेले. म्हणजे मृत्यूचे प्रमाणदेखील अमेरिकेत तिपटीने जास्त आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोनामुळे एका दिवसात सर्वात जास्त जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी एकूण ५८५ नवे मृत्यू झाले. कॅलिफोर्नियामध्ये आतापर्यंत एकूण मृत्यूचे आकडे २५,९७१ वर पोहोचले आहेत. लॉस एंजलिसमध्ये सर्वात जास्त मृत्यू झाले. गेल्या तीन दिवसांत अमेरिकेत नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसते. दररोजच्या रुग्णसंख्येचे प्रमाण १८.२ टक्के होते. ते नवीन वर्षात वाढून २१.५ टक्के वाढले.

आणीबाणी लागू करण्याचा जपानचा विचार, फ्रान्समध्ये १५ भागांत संचारबंदी लागू
जपानमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्यानंतर सरकार नवी कोविड-१९ आणीबाणी लागू करण्याचा विचार करत आहे. देशातील महामारी व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय प्रमुखांनी शनिवारी ही माहिती टोकियोत दिली. नवे रुग्ण वाढू लागले आहेत. ३१ डिसेंबरला ४,५२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये नव्या वर्षाचा जल्लोष करताना लोकांनी नियमांची ऐशीतैशी केली. त्यामुळे सरकारने १५ प्रांतांत संचारबंदी लागू केली.

नवा स्ट्रेन आढळलेला तुर्की ठरला ३३ वा देश, देशात आढळले १५ रुग्ण
तुर्कीने ब्रिटनसोबत सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे. तुर्कीचे आरोग्यमंत्री फहरेतीन कोका म्हणाले, आमच्याकडे नव्या स्वरूपाच्या विषाणू संसर्गाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये ८ डिसेंबरला सापडलेल्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झालेला तुर्की हा ३३ वा देश ठरला आहे. आतापर्यंत ४० देशांनी ब्रिटनच्या प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही नव्या स्ट्रेनचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. नव्या स्ट्रेनमुळे लोक आणखी दक्षता बाळगू लागले आहेत.

ब्रिटनच्या रुग्णालयांत खाटा कमी, दोन आठवड्यांसाठी शाळा बंद
ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालयात खाटा कमी पडू लागल्या आहेत. शुक्रवारी येथे २८ हजारांहून जास्त रुग्ण देशांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. ब्रिटिश आरोग्य विभागाचे एक अधिकारी म्हणाले, आमच्यासमोर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होत आहे. देशातील प्रत्येक भागात बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. ब्रिटिश सरकारने पुढील दाेन आठवड्यांसाठी लंडनच्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या २४ तासांत ब्रिटनमध्ये ५३ हजारांहून जास्त नवे रुग्ण आहेत. ६३० लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५ लाख ४२ हजार ६५ लोकांना बाधा झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...