आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने युक्रेनवरील हल्ला तीव्र केला आहे. त्यांनी डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे दक्षिण-पूर्व युक्रेनच्या जेपोरियाजिया शहरातील ५ मजली निवासी इमारतीची पडझड झाली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, न्यूयॉर्कनुसार, युद्धाचा सर्वात भीषण काळ सध्या सुरू आहे. लष्कराने अमेरिकेच्या एम ७७७ आणि फ्रान्सच्या सेन्सर होवित्झर ताेफांनी दोनेत्स्कच्या वुहलेदारमध्ये हल्ला करून रशियाचे १३० रणगाडे व शस्त्रसज्ज वाहने नष्ट केले आहेत.युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाच्या एलिट ब्रिगेडचे ५ हजार जवान दोन आठवड्यांत मारले गेले आहेत,यावरून रशियन फौजांना पिटाळल्याचा अंदाज येतो. वुहलेदार पूर्व युक्रेनमध्ये रशियासाठी सर्वात महत्त्वाच्या लक्ष्यांपैकी एक असल्याचे सांगण्यात येते.यादरम्यान, एक ओपन सोर्स इंटेलिजन्स वेबसाइट ओरिक्सनुसार, आतापर्यंत युद्धात रशियाचे १००० रणगाडे नष्ट केल्याचे सांगण्यात येते.
एक वर्षात प्रथम रशिया-अमेरिकी विदेशमंत्री भेटले रशियन विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह गुरुवारी नवी दिल्लीत जी-२० विदेश मंत्र्यांच्या बैठकीत अमेरिकी विदेशमंत्री अँटनी ब्लिंकेन यांना भेटले. युद्ध सुर झाल्यानंतर एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर दोन्ही विदेश मंत्र्यांची ही पहिली भेट आहे. विशेष म्हणजे, दोघांची भेट बैठकीच्या आधी निश्चित नव्हती. मात्र,रशियाने यात काही साध्य न झाल्याचा दावा केला आहे.
रशिया सोडण्यात अमेरिकी, ब्रिटिश कंपन्या असमर्थ अनेक पाश्चिमात्त्य कंपन्यांनी रशिया सोडले आहे. दुसरीकडे, युरोप व अमेरिकेतील शेकडो कंपन्या रशिया सोडण्यास तयार नाहीत. यात फ्रान्सची सुपरमार्केट चेन ऑचेनही आहे. ऑचेनची सहायक कंपनीने रशियन लष्कराला भोजनाचा पुरवठा केला. युरोप, अमेरिका,जपान, ब्रिटन व कॅनडातील १४०० कंपन्याँपैकी ९% नी युक्रेन सोडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.