आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 135 Aircraft Destroyed In 15 Years, Half Of Them MiGs; 200 Pilots Lost | Marathi News

विमान अपघात:15 वर्षांत 135 विमाने नष्ट, त्यापैकी निम्मे मिग; 200 वैमानिक गमावले

नवी दिल्ली / मुकेश कौशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात २००७ ते २०२२ या १५ वर्षांच्या काळात १३५ विमाने नष्ट झाली, त्यात अर्ध्यापेक्षा जास्त मिग लढाऊ विमाने होती. त्यामु‌ळे देशाचे २ हजार २८२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्ष २००७ ते २०१२ दरम्यान दरवर्षी १३ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली, तर त्यानंतर ही सरासरी ८ एवढी होती. आता दरवर्षी ६ विमानांचा अपघात होत आहे. गेल्या १५ वर्षांत एकूण १३५ विमाने पडली असून, त्यात लष्कराने २०० लढाऊ वैमानिक गमावले आहेत. वायुदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०२०-२१ मध्ये विमान दुर्घटनांचा दर ५० वर्षांत सर्वात कमी होता. त्याचे मोठे कारण हेही आहे की, लढाऊ विमानांच्या ताफ्यात मिग-२१ च्या ४ स्क्वॉड्रनच राहिल्या आहेत. त्यापैकी एक स्क्वॉड्रन सेवेतून बाहेर होईल. त्यानंतर दरवर्षी एक स्क्वॉड्रन सेवेतून बाहेर पडेल.

अशा प्रकारे तीन वर्षांत मिग-२१ सेवेतून बाहेर पडतील. या विमानांना ‘उडता ताबूत’ म्हटले जाते. मिग-२१ विमानांचा १९६३ मध्ये लष्करात समावेश करण्यात आला. आतापर्यंत ८७५ विमानांचा भारतीय लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी अर्धी विमाने अपघातग्रस्त झाली आणि उर्वरित फेज आऊट झाली.

तीस वर्षांमध्ये निवृत्ती अपेक्षित होती
मिग-२१ विमानांचा समावेश झाल्यानंतर ३० वर्षांच्या आत ती फेज आऊट केली जातील, असे वर्ष १९७१ मध्ये निश्चित करण्यात आले होते. तथापि, लढाऊ ताफ्याची ताकद कायम ठेवण्यासाठी ओव्हरहॉलिंगने त्यांचे ऑपरेशनल वय वाढवण्यात आले. मिग-२१ ची मुदत संपली आहे यात काहीही शंका नाही. ते सेवेत ठेवण्यासाठी त्यांची देखभाल ठेवणे सोपे नाही. वायुदलाकडे मिगची २० स्क्वॉड्रन होती. फेज आऊट प्लॅनअंतर्गत सुखोई-३० च्या १५ आणि तेजसच्या २ स्क्वॉड्रनचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे लढाऊ विमानांची भरपाई केली जाते. विमाने सेवेतून बाहेर काढण्याची योजना निश्चित असते. कुठलेही लढाऊ विमान म्हणजे उडणारे यंत्र नाही. ते नव्या युगानुसार शक्तिशाली असणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...