आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळवंटात स्काऊट गाइडसाठी वसतेय गाव...:जाेधपूरमध्‍ये  1368 बिघ्यात तंबू, बाजार-हेलिपॅडही

मनीष बोहरा, जोधपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

४ ते १० जानेवारी २०२३ पर्यंत होणारी १८ वी राष्ट्रीय स्काऊट गाइड मेळ्यासाठी जोधपूर-पाली सीमेवर ९ किमी परिसरात अस्थायी गाव वसवले जात आहे. निंबली टोल नाक्यापुढील नॅशनल हायवेनजीक रिकोच्या १३६८ बिघे जमिनीवर मेळ्याचे काम ६०% पूर्ण झाले आहे. येथे २७०० तंबूत देशभरातील ३५ हजार स्काऊट गाइड राहतील. ३००० टॉयलेट, २५०० बाथरूम, खरेदीसाठी २ बाजार, व्हीआयपीसाठी २ हेलिपॅड, १ रुग्णालय, ३ डिस्पेन्सरी, ८०० वाहनांची पार्किंग, किचन व २ कॉन्फरन्स व एक मीटिंग रूम, अॅडव्हेंचरसाठी ३ वॉच टॉवर व गेमिंग एरियाही विकसित केला जात आहे. राज्य सरकार यावर २५ कोटी रुपये खर्च करत आहे. पाणी आणण्यासाठी ५ किमीवरून पाइपलाइन टाकली आहे.३ ६०० केएलचा स्थायी टँक स्थापन केला आहे. दररोज १२०० केएल वापर होईल.

बातम्या आणखी आहेत...