आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 13,826 Patients Increased In Last 24 Hours, 3.18 Lakh Infected So Far India Corona Virus Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:गेल्या 24 तासांमध्ये 13,826 रुग्ण वाढले, आतापर्यंत 3.18 लाख संक्रमित, 5 दिवसात 42 हजार रुग्णांची कोरोनावर मात 

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील मृतांची संख्या 12 हजार 605, महाराष्ट्रात सर्वात जास्त 5751 मृत्यू
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त 3752 रुग्ण वाढले, दिल्लीनंतर यूपी-हरियानामध्ये कोरोना तपासणी फीस 2400 रुपये होऊ शकते

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 3 लाख 81 हजार 91 झाली आहे. यामधील आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये 42 हजार 856 लोक बरे झाले आहेत. गुरुवारी सर्वात जास्त 13 हजार 826 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. तर गेल्या 24 तासांमध्ये 342 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

पाच दिवसातील बरे झालेले रुग्ण

तारीखरुग्ण बरे झाले
19 जून10743
18 जून6890 
17 जून7226
16 जून10639
15 जून7358

दिल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 2877 लोकांना कोरोनाची बाधा झाली. येथे 50 हजारांच्या जवळपास रुग्ण झाले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 24 तासांमध्ये सर्वात जास्त 3752 नवीन रुग्ण समोर आले. यानंतर राज्यात संक्रमितांची संख्या 1 लाख 20 हजार 504 झाली आहे. 

5  दिवसांत सर्वात जास्त रुग्ण आले समोर 

तारीख

केस
19 जून13826
18 जून13107
13 जून12031
14 जून11374
12 जून11314
बातम्या आणखी आहेत...