आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परदेशातून येणाऱ्यांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गाइडलाइंस जारी केल्या आहेत. यानुसार, परदेशातून येणाऱ्यांसाना 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहणे बंधनकारक असेल. यात 7 दिवस सरकारने ठरवलेल्या सेंटरमध्ये आणि 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. सरकार ने ठरवलेल्या सेंटरमध्ये क्वारंटाइन राहण्यासाठी येणारा खर्च त्या संबंधित व्यक्तीला द्यावा लागेल.
गाइडलाइनच्या 16 अटी-शर्ती
1. विमानात बरण्यापूर्वी प्रवाशाला लिखीतमध्ये द्यावे लागेल की, तो 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहील. यातील 7 दिवस तो स्व खर्चावर सरकारच्या सेंटरमध्ये आणि 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहील.
2. याबाबत काही अपवाद असतील. तनावग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, कुटुंबातील मृत्यू, गंभीर आजार, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत पालक, यांची जबाबदारी राज्य सरकारची असेल. या लोकांसाठी 14 दिवसांचा होम क्वारंटाइन पिरीअड असू शकतो. यादरम्यान आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक असेल.
3. प्रवासादरम्यान काय करावे आणि काय नाही, याची माहिती तिकीट घेतेवेळी संबंधित कंपनी देईल.
4. सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे गरजेचे असेल.
5. विमानात किंवा जहाजात चढताना थर्मल स्क्रीनिंग केली जाईल. यादरम्यान आजाराची लक्षणे नसलेल्या व्यक्तीलाच येऊ दिले जाईल.
6. रस्ते मार्गाने देशात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांनाही वरील नियमांचे पालन करावे लागेल.
7. एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मदेखील दोन कॉपींध्ये भरावा लागेल. एक कॉपी इमिग्रेशन सेंटरवर जमा करावी लागेल. हे सेंटर प्रत्येक एयरपोर्ट, बंदर आणि लँड बॉर्डरच्या एंट्री पॉइंटवर असेल. हा फॉर्म आरोग्य सेतू अॅपवर उपलब्ध आहे.
8. सर्व महत्वपूर्ण गोष्टींचे पालन करावे लागेल. एअरपोर्ट आणि फ्लाइटमध्ये सॅनिटायजेशन आणि डिस्इंफेक्शनची व्यवस्था करावी लागेल.
9. बोर्डिंग आणि एअरपोर्टवर सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल.
10. एअरपोर्ट, बंदर किंवा लँड बॉर्डर चेक पॉइंटवर कोविड-19 संबंधित अनाउंसमेंट करने गरजेचे असेल.
11. प्रवासादरम्यान क्रू मेंबर्सची ही जबाबदारी असेल की, सर्व प्रवाशांनी मास्क घातलेले असावे. तसेच, सॅनिटायजेशन आणि डिस्इंफेक्शनची जबाबदारी संबंधित कंपनी आणि क्रु मेंबरची असेल.
12. अरायव्हलदरम्यान एअरपोर्ट, सी-पोर्ट किंवा लँड पोर्टवर हेल्थ टीमकडून प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल.
13. स्क्रीनिंगदरम्यान प्रवाशात आजाराची लक्षणे आढळल्यास, हेल्थ ऑफिशियल्स तात्काळ त्याला आयसोलेट करतील.
14. उर्वरित प्रवाशांना राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारी सेंटरमध्ये पाठवले जाईल.
15. या प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाइन सेंटरमध्ये राहावे लागेल. यादरम्यान त्यांची चाचणी होईल आणि पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचा उपचार केला जाईल.
16. लक्षणे आढळल्यास त्यांना होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल. तसेच, त्यांना सरकारी किंवा खासगी कोव्हिड सेंटरमध्ये पाठवले जाऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.