आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 14 kilala Indigenous Rocket Launcher On The Shoulders Of Women, Simulator On The Leaves!

भोपाळमध्ये कंबाइंड कमांडर्स कॉन्फरन्स:माेदींच्या खांद्यावर 14 किलाेचे स्वदेशी राॅकेट लाँचर, डाेळ्यांवर सिम्युलेटर!

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान माेदींच्या खांद्यावर दिसणाऱ्या या राॅकेट लाँचरचे वजन सुमारे १४ किलाे आहे. ताे व्हर्च्युअली रिअॅलिटी बेस्ड ८४ एमएम राॅकेट लाँचर आहे. हे तंत्रज्ञान स्वदेशी फायरिंग सिम्युलेटरसाेबत डिझाइन केले गेले. सरावात राॅकेट लाँचरने रणगाडे उद्ध्वस्त करता येत नाहीत म्हणून सिम्युलेटरने सीन क्रिएट केला जाताे आणि त्याला लक्ष्य केले जाते. लाँचरला खांद्यावर ठेवून आणि सिम्युलेटरच्या साह्याने ते वापरले जाते. या राॅकेट लाँचरची रेंज एक किमी आहे. ३०० ते १००० मीटरपर्यंतचे अंतरही कव्हर केले जाऊ शकते. याद्वारे रणगाडे, बंकर, पायदळातील सैनिकांवर नेम साधला जाऊ शकतो. त्याची निर्मिती सिम्युलेटर डेव्हलपमेंट डिव्हिजन सिकंदराबादमध्ये झाली आहे. भारतीय लष्कराची ही संशाेधन व विकास संस्था आहे.

येथे विविध १३५ प्रकारचे सिम्युलेटर तयार करण्यात आले आहेत. राॅकेट लाँचरचा वापर काेणत्या परिस्थितीत केला जाऊ शकताे हे पाहण्यासाठी पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर हेड माउंटेड डिस्प्ले लावला गेला. यातून अगदी वास्तववादी अनुभव येताे. त्याचा वापर करणाऱ्यांना फार कमी वेळा फायरिंग रेंजमध्ये जाण्याची गरज भासते. त्यामुळे वेळेचीही बचत हाेते. या तंत्रामुळे ते हाताळण्याचा सरावही करता येताे. हे खरेखुरे शस्त्र चालवण्याचे रिअॅलिस्टिक प्रशिक्षण मानले जाते. या स्वदेशी लाँचरला मिशन संरक्षण ज्ञानशक्तीअंतर्गत इंडियन आर्मीकडून आयपीआर (इंटिलेक्चुअल प्राॅपर्टी राइट) फाइल मिळाले आहे.