आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा बळी:गुजरातमध्ये 14 महिन्यांच्या बाळाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू, देशात बळींचा आकडा 192 वर

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • काेराेना व्हायरसचा एक रुग्ण 30 दिवसांत तब्बल 406 जणांना संक्रमित करू शकतो

राज्यांच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात कोरोनाचे ५०९ नवीन रुग्ण व ५ नवीन मृत्यू झाले. त्यानुसार देशात अातापर्यंत ५,१९२ रुग्ण आढळले असून बळींचा आकडा १९२ वर गेला आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत एकूण रुग्ण ४,७८९ व मृत्यू १२४ दाखवले आहेत.  

  • गुजरातच्या जामनगरमध्ये प्रवासाचा कसलाही इतिहास नसताना काेरोनाची बाधा झालेल्या १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. प्रकृती गंभीर असल्याने हे बाळ व्हेंटिलेटरवर होते. मुलाच्या आई-वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
  • नाेएडात झोपडपट्टीतील २०० जणांना क्वॉरंटाइन केले.
  • काेराेना व्हायरसचा एक रुग्ण ३० दिवसांत तब्बल ४०६ जणांना संक्रमित करू शकतो
  • आरोग्य मंत्रालयानुसार, काेराेनाच्या रुग्णाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही तर ३० दिवसांत तो ४०६ लोकांना संक्रमित करू शकतो. मात्र, लाॅकडाऊनदरम्यान ताेे रुग्ण फक्त २.५ जणांनाच संक्रमित करू शकतो.
बातम्या आणखी आहेत...