आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाची स्थिती:दिल्ली, मुंबईतील खासगी रुग्णालयांत कर्मचाऱ्यांत संसर्गाची 14 नवी प्रकरणे; उपचार करणाऱ्या योद्ध्यांवर वाढतोय धोका

नवी दिल्ली/मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात डॉक्टर, नर्स व एक इतर कर्मचारी बाधित, ३९ क्वॉरंटाइनमध्ये
  • मुंबईतील भाटिया रुग्णालयात आणखी ११ आरोग्य सेवकांना संसर्ग, एकूण २५ झाले

दिल्ली व मुंबईत सोमवारी १४ आरोग्य कर्मचारी बाधित आढळले. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात एक डॉक्टर, एक नर्स व एक इतर कर्मचारी बाधित आढळले. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात हृदयविकाराच्या उपचारासाठी दोन रुग्ण दाखल करण्यात आले होते. नंतर ते दोन्ही बाधित आढळले. रुग्णालयाने सांगितले की, ३९ आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयात क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. ते बाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते. मात्र त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसलेली नाहीत. रुग्णांच्या संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे १४ एप्रिलला त्यांची तपासणी केली जाईल. कोरोना वॉर्डात १५४ कर्मचारी आहेत. त्यांचे कुटुंबीय व शेजाऱ्यांना संसर्गाची भीती नसावी म्हणून ते रुग्णालय परिसरातच थांबतात. दिल्लीत कोरोनाचे ११५४ रुग्ण आहेत. २४ मृत्यू झालेत. मुंबईतील भाटिया रुग्णालयात आणखी ११ कर्मचारी बाधित आढळले आहेत. आतापर्यंत २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. १५ कर्मचाऱ्यांची तपासणी केली होती.

राजस्थान : कोटात महिलांनी पिशवीत थुंकून फेकले

कोटा : राजस्थानात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असतानाही कोटा जिल्ह्यात धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज दिसले आहेत. यात काही महिला प्लास्टिकच्या पिशवीत थुंकून दुसऱ्यांच्या घरात फेकत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काश्मीर : मुंबईत क्वाॅरंटाइन राहिलेले ४४ जण परतले

श्रीनगर : मुंबईत घाटकोपर येथील वायुदलाच्या क्वॉरंटाइन केंद्रात ३० दिवस राहिलेले जम्मू-काश्मीरचे ४४ जण सोमवारी श्रीनगर परतले. ते इराणहून मुंबईला आले होते. १३ मार्चपासून त्यांना क्वाॅरंटाइनमध्ये ठेवले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यूपी : लखनऊत केजीएमयूत ६५ कर्मचारी क्वॉरंटाइन

लखनऊ : यूपीतील लखनऊतील केजीएमयू रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरच्या ६५ कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. यात डॉक्टरही आहेत. मात्र, त्यांची संख्या सांगितली नाही. शनिवारी एका ६४ वर्षीय रुग्णाला श्वसनात त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. नंतर तो बाधित निघाला.

बिहार : नालंदात शेतकऱ्यांची निदर्शने, पोलिसांवर संताप

नालंदा : बिहारच्या नालंदात शेतकऱ्यांनी निदर्शने केली. पोलिस त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर नालंदाचे एसपी नीलेशकुमार यांनी सांगितले की, मोटारसायकलीवर शेतकरी आहे की दुसरा हे ओळखणे अनेकदा कठीण होते. तक्रारीची चौकशी केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...