आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:भारतीय महिलांना 14 दिग्गज अमेरिकी तंत्रज्ञ प्रशिक्षण देणार

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील १४ नामांकित कंपन्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ५-५ लाख महिलांना प्रशिक्षण देतील. यात अॅपल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि व्हिजासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. महिला व मुलींना शिक्षणाची पुरेशी संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यात डेटा, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि सायबर सेक्युरिटीसारख्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बायडेन सरकारच्या धोरणांनुसार, भारतासह १३ देशांतील महिलांना या कार्यक्रमाचा लाभ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना अमेरिकी वाणिज्य सचिव जिना रायमोंडो म्हणाले, येत्या दहा वर्षांत ७० महिलांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे ऑनलाइन गाेपनीयता भक्कम होईल व सायबर चोरी रोखण्यात यश मिळेल.

बातम्या आणखी आहेत...