आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 145 Castes Of Artisans To Be Eyed Through Centre's 'Vishwakarma' Scheme, Non OBC Vote Bank

2024 निवडणुकीसाठी भाजपचे सोशल इंजिनिअरिंग नवे शिल्प:केंद्राच्या ‘विश्वकर्मा’ योजनेद्वारे कारागिरांच्या 145 जातींवर नजर

नवी दिल्ली / मुकेश कौशिक/सुजित ठाकूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही बिगर ओबीसी व्होट बँक

मोदी सरकारने मोठ्या सोशल इंजिनिअरिंगची तयारी केली आहे. अर्थसंकल्पात जाहीर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा देशातील सुमारे १४५ जातींच्या लोकांना लाभ घेता येईल. कारागिरीसारख्या वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित या कुटुंबांकडे भाजप ‘ग्रीन फील्ड’ म्हणून पाहत आहे. कारण त्यांच्यासाठी कोणतेही समान व्यासपीठ नाही. ज्या जातींना योजनेत समाविष्ट केले त्या उत्तर भारतातील मागास आहेत. या १४५ जातींपैकी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमधील डझनभर जागांवर ६० जातींचे संख्याबळ जास्त आहे. भाजपच्या रणनीतिकाराने सांगितले की, यूपीतील ८० लोकसभा मतदारसंघांत या जातींचा सपा आणि बसपाच्या मतांशी संबंध नाही. उत्तर प्रदेशात २०१४ च्या मोदी लाटेत या जातींनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे ही मते कायमस्वरूपी जोडण्यासाठी भाजपने खास योजना आणली आहे.

ब्राह्मणही या योजनेच्या कक्षेत, त्यांना आर्थिक मदत मिळणार
शिल्पकला, कलाकुसरीसारख्या व्यवसायाशी निगडित डझनभर जाती आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, परंतु सामाजिकदृष्ट्या उच्च स्तरावर आहेत. विश्वकर्मा योजनेच्या कक्षेत येणारे अनेक समाज ब्राह्मण वर्गात आहेत. मागासवर्गीयांसाठी असलेल्या अशा एखाद्या सरकारी योजनेत त्यांना पहिल्यांदाच वाटा मिळाला आहे.। त्यात चतुर्वेदी, मालवीय, आचार्य, साहू, रस्तोगी, द्विवेदी, उपाध्याय, महापात्रा, पांचाळ ब्राह्मण, विश्वब्राह्मण, पांचोली, झिंटा, पित्रोदा, झा यांचा समावेश अाहे.

व्यवसाय सुरू करण्यास देणार आर्थिक मदत, एमएसएमअाय शृंखलेत सहभाग
कारागीर आणि शिल्पकारांना सरकार
आर्थिक मदत करेल. ते एमएसएमई शृंखलेशी जोडले जातील. ज्या लोकांकडे पुरेसे भांडवल नाही त्यांना तारण न घेता स्वस्त कर्ज मिळेल. कारागीर आणि शिल्पकारांनाही प्रशिक्षण
दिले जाणार आहे. यातून स्वयंरोजगार वाढवण्याची योजना आहे.

योजनेतील वर्गांचे हे मुख्य व्यवसाय...
दुर्मिळ वस्तू बनवणारे, टाेपली, चिनी माती, घड्याळे कारागीर, भरतकाम, रंगरंगोटी, ब्लॉक प्रिंटिंग सामान, सजावटीचे रंगकाम, काचकाम, कापडावरील रंगकाम, फर्निचर, भेटवस्तू, गृहसजावट, दागिने, लेदर क्राफ्ट, मेटल क्राफ्ट, पेपर क्राफ्ट, भांड्यांवरील नक्षीकाम, कठपुतली, स्टाेनवर्क, दगडकाम, लाकूडकाम इत्यादी.

या जातीही योजनेच्या कक्षेत
कंसला, रावत, कंसन, रायकर, कंशाली, सागर, कारगथारा, शाहू, कर्माकर, सरवरिया, कॉलर, शर्मा, कॉलर पोंकोल्लर, शिल्पी, केसर, कुलाचार, सिन्हा, कुलरिया, सोहागर, सोनगार, लौता, सोनार, लोहार, सोनी, माहुलिया, सुथार, मैथिल, सुवर्णकार, मालवीय, ठाकूर, मलिक, ताम्राकर, राणा, राधिया, राव, पल्लीवल आणि मधुकर कंसाली, चेट्टियन, कंचारी, चिक्कामने, कंचुगरा, चिपेगरा, कन्नलन, चोल, कन्नालर, कन्नार (पितळ कामगार), दास, आचारी, देवगण, आचार्य थॅचर, धीमान, ढोले, एक्कासले, अर्कसल्ली, गज्जर, असारी, गीद, असारी ओड्डी, गज्जीगर, अस्ला, गिज्जेगरा, औसूल, माशुक, बघेल, गुर्जर, बडीगर, जंगर, बग्गा, जांगिड, बैलपाठरा कलासी, बैलुकममारा, कमर, भादिवडाला, कंबरा, भारद्वाजा, कममलन, बिधानी, कमलार, विश्वकर्मा, कमलार, बोगारा, कममियार, बोस, कम्मारी, ब्रह्मलू, कममियार, चारी आणि कमसाला मालवीय, तमटा, माताचार, मेणचेर, तोरखान, तोचेर , मिस्त्री, उपनकर, मोहराणा, उत्तरादी (सुवर्णकार), मुळेकामरस, वडला, ओझा, वद्रांसी, पांचाल, वत्स, पांचाल ब्राह्मण, विप्पाता, पांचालर, विश्वब्राह्मण, पांचोली, विश्वकर्मा, विश्वकर्मा मनु, मायाब्रह्म, पाथरा परीडा, वकसाळी, पत्थर, जिंटा, पातूरकर, प्रजापती, सतवारा, पोरकोलार, राम गादिया, मारू यांचा समावेश अाहे.

बातम्या आणखी आहेत...