आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 146 Went To Ask And 367 Lost! There Is No OBC Reservation In 271 Gram Panchayats Including 92 NPs

सुप्रीम काेर्टाचे आदेश:146 चे विचारायला गेले अन् 367 गमावून बसले! 92 न.प.सह 271 ग्रामपंचायतींत ओबीसी आरक्षण नाही

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ९२ नगर परिषदा, ४ नगरपंचायती आणि २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण दिले तेव्हा १४६ ग्रामपंचायतींमधील उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. त्याबाबत स्पष्टता यावी म्हणून राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणच स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे. आमच्या आदेशाचा सोयीने अर्थ लावू नका, तसेच निवडणुका पुढे ढकलल्यास हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल, असेही न्यायालयाने सरकारी वकिलांना या वेळी फटकारले.

निवडणुका पुढे ढकलण्याची सरकारची होती विनंती
न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्यापुढे सुनावणी झाली. राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी विनंती सरकारने निवडणूक आयोग आणि कोर्टातही केली होती. यावरूनच न्यायालयाने सरकारला फटकारले. बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायालयाने ओबीसींना २७% राजकीय आरक्षण २० जुलै रोजी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ओबीसींना आरक्षण देताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, ओबीसींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक होऊ नये, अशी अटही यात नमूद होती. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याने राजकीय पक्षांनी तयारीही सुरू केली होती.

ग्रामपंचायतींचा मुद्दा न्यायालयात नेल्याने प्रकरण सरकारच्या अंगलट
सुनावणी सुरू असताना आयोगाने पूर्वीच निवडणुका जाहीर केल्या होत्या. एम्पिरिकल डेटा सादर झाल्याने ओबीसी आरक्षण मिळाले. मात्र, सरकारने १४६ ग्रामपंचायतींचा मुद्दा न्यायालयात नेल्याने हे प्रकरण त्यांच्याच अंगलट येऊन ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांत मिळालेले आरक्षण आता मिळणार नाही.

मराठवाड्यात या तालुक्यांतील ग्रामपंचायतींत ४ रोजी मतदान
- औरंगाबाद- १, पैठण- ७, गंगापूर- २, वैजापूर- २, खुलताबाद- १, सिल्लोड- ३
- जालना- ६, परतूर- १, बदनापूर- १९ आणि मंठा- २. - बीड- ३, गेवराई- ५, अंबाजोगाई- ५. - उस्मानाबाद : तुळजापूर- २, कळंब- १, उमरगा- ५, लोहारा- २ वाशी- १.

बातम्या आणखी आहेत...