आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:लॉकडाऊनच्या दोन महिन्यात 1461 रस्ते अपघात, 750 मृत्यूमुखी, 26% प्रवासी मजूर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
लॉकडाउन दरम्यान उत्तरप्रदेशात झालेल्या एका रस्ते अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला होता. - Divya Marathi
लॉकडाउन दरम्यान उत्तरप्रदेशात झालेल्या एका रस्ते अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला होता.
  • उत्तरप्रदेशमध्ये मध्ये सर्वाधिक 245 ठार तर मध्यप्रदेशात 56 ठार

कोरोनामुळे देशात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकउाऊन होता. दरम्यान रस्ते सुनसान होते. तरीही लॉकडाऊन काळात दोन महिन्यांत देशभरात १४६१ रस्ते अपघात घडले. यात ७५० लोक मृत्यूमुखी पडले. या रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेले २६% प्रवासी मजूर होते. सेव्ह लाइफ फाऊंडेशनने २४ मार्च ते ३० मे दरम्यानचे रस्ते अपघात व यात झालेल्या मृतांचे विश्लेषण करुन ही आकडेवारी देण्यात आली आहे.

फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासानुसार दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळ सुरू असलेल्या लाॅकडाऊन काळात जे रस्ते अपघात झाले त्यात २६.४ % प्रवासी मजूर होते. ५.३ मृत अत्यावश्यक सेवेतील होते. एकुण मृतांत ६८.३% लोक सामान्य अथवा पादचारी होतेे.

लॉकडाऊनचा चौथा टप्पा खूप धोकादायक : संशोधनात लाॅकडाऊनचा चौथा टप्पा खूप धोकादायक ठरला. यादरम्यान, ३२२ जण मृत्यूमुखी पडले.

यूपीमध्ये सर्वाधिक २४५ ठार तर एमपीमध्ये ५६ ठार

घरांकडे परत चालेले १९८ मजूर रस्ते अपघातात ठार झाले. यातील ३०% हून अधिक संख्या उत्तर प्रदेशातील मजुरांची होती. तेथे २४५ जण ठार झाले. तेलंगणा व मध्य प्रदेशात ५६-५६ लोक मृत्यूमुखी पडले. हा डाटा माध्यमांतील बातम्या व मल्टी- सोर्स पडताळणीनंतर तयार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...