आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोनाविरुद्ध लढाईच्या आघाडीवर दोन सुवार्ता आहेत. पहिली म्हणजे देशात नव्या रुग्णांत सातत्याने घट होत आहे. चोवीस तासांत केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात व पश्चिम बंगालमध्ये ४०० हून जास्त रुग्ण आहेत. केवळ केरळ व महाराष्ट्रात ४० हजारांहून जास्त सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रमाण देशातील एकूण रुग्णांच्या ७० टक्के एवढे आहे. केरळमध्ये ७२ हजार तर महाराष्ट्रात ४४ हजार सक्रिय रुग्ण आहेत. सात वर्षांत १४७ जिल्ह्यांत गेल्या सात दिवसांत नवा रुग्ण आढळून आलेला नाही. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, या जिल्ह्यांत १८ पैकी १४ दिवसांत सहा जिल्ह्यांत २१ दिवसांत आणि २१ जिल्ह्यांत तर २८ दिवसांत एकही रुग्ण नाही.
- डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ब्रिटनमधील नव्या कोराेनामुळे देशात १५३ लोक बाधित झाले आहेत.
- नवा प्रकार जास्त धाेकादायक असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटलेय. तो आतापर्यंत ७० देशांत पसरला. त्याला बी.१.१.७ व्हीआेसी २०२०१२/०१ असे नाव देण्यात आले आहे. ब्रिटन, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँडमध्ये या नव्या प्रकारच्या विषाणूबाधितांच्या संख्येत घट झाली.
- हा दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या प्रकाराहून वेगळा आहे. आफ्रिकेतील विषाणू ३१ देशांत पोहोचला.
- गेल्या आठवड्यात संसर्गाचे प्रकरण पूर्वीच्या तुलनेत १५ टक्के कमी झाले. महामारी सुरू होण्याच्या एक आठवड्याआधीच्या आकडेवारीपेक्षा ते कमी आहेत.
भारत श्रीलंकेला ५ लाख डोस भेट देणार
नेपाळ, बांगलादेश, भूतानसारख्या देशांनंतर भारत आता श्रीलंकेला कोरोना लस कोविशील्डचे ५ लाख डोस भेट देणार आहे. ही खेप गुरूवारी कोलंबोला रवाना झाली. व्हॅक्सिन मैत्री अभियानांतर्गत भारत ही लस पाठवत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ५ ते ७ जानेवारी दरम्यान श्रीलंकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात श्रीलंकेने कोरोना लसीची तातडीची मागणी केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.