आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाजावर दुष्परिणाम:सनदी अधिकाऱ्यांची 1472 पदे रिक्त, बिहारमध्ये 37 टक्के

पवन कुमार | नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सनदी अधिकाऱ्यांची १४७२ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ८५० पदांची यूपीएससीद्वारे थेट आयएएस भरती होणार होती. राज्य सरकारकडून बढती देऊन भरती अपेक्षित असलेल्या रिक्त पदांची संख्या ६२२ आहे. नियोजित पदांच्या संख्येत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नसल्याने दुसऱ्या सेवेतील अधिकाऱ्यांकडे या पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या कमरतेमुळे दरवर्षी राज्यांतून केंद्रीय प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. केंद्र सरकार संयुक्त सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुटवड्यामुळे इतर सेवांतून ही गरज भागवली जात आहे. बस्वान समितीच्या शिफारशींच्या आधारे दरवर्षी थेट भरतीद्वारे १८० हून जास्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. समितीच्या म्हणण्यानुसार ही संख्या वाढवण्यात आली तर गुणवत्तेवर परिणाम होईल.

झारखंडमध्ये ३१ %, महाराष्ट्रात १८ % पदे रिक्त राज्य एकूण पदे रिक्त (% ) एजीएमयूटी 403 18.6 बिहार 359 37 छत्तीसगड 193 14 गुजरात 313 16.6 हरियाणा 215 17.2 हिमाचल 153 19 झारखंड 224 31.3 मप्र 415 19.1 महाराष्ट्र 415 17.8 पंजाब 231 16.5 राजस्थान 313 16.6 एकूण 6789 21.7

वर्ष 2017 2018 2019 2020 2021 संख्या 43 25 37 14 28

बातम्या आणखी आहेत...