आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात उसळला भक्तांचा सागर...:28 दिवसांमध्ये सबरीमाला मंदिरात 148 कोटींचे दान

कोची2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केेरळचे सबरीमाला मंदिर भक्तांनी दिलेल्या देणग्यांमुळे भरले आहे. यामुळे त्रावणकोर देवस्वोम मंडळ(टीडीबी) व्यवस्थापनात आनंदाचे वातावरण आहे. मंदिरात २०१८ मध्ये महिलांच्या प्रवेशाविरोधात आंदोलन सुरू झाल्याने अभूतपूर्व संकट आले होते. मात्र, टीडीबीनुसार, मंडलामकरविलक्कू हंगामाच्या केवळ २८ दिवसांत १४८ कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. हा हंगाम २१ जानेवारीपर्यंत चालेल. दान असेच राहिल्यास ५ वर्षांचा विक्रम मोडीत निघू शकतो.

बातम्या आणखी आहेत...