आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 15 August 2020 Celebrations Advisory By Ministry Of Home Affairs (MHA) Independence Day

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांवर कोरोनाचा परिणाम:गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना - सामूहिक आयोजन करु नका, तंत्रज्ञानाचा वापर करुन साजरा करा उत्सव

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहराज्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना- 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासंदर्भात शासकीय कार्यालये, राज्य सरकार आणि राज्यपालांना पाठवले पत्र
  • राज सरकारांना सल्ला - कार्यक्रमांमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना सन्मान देण्यासाठी कार्यक्रमात बोलवा

केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना जारी केली. ही सूचना सर्व सरकारी कार्यालये, राज्य सरकार आणि राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे. सूचनांमध्ये स्वातंत्र्यदिनी सामूहिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

संक्रमणाचा धोका 
सूचनांमध्ये म्हटले आहे की, संक्रमणाचा धोका पाहता काही नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोशल डिस्टेंसिंग, मास्क, सॅनिटायजेशनसारखे उपाय योजावे लागतील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. होम आणि हेल्थ मिनिस्ट्रीच्या पहिले जारी केलेल्या गाइडलाइंन्सचे पालन करावे लागेल. वेब कास्टच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे.

राज्य सरकारांना सल्ला 
राज्य सरकारांना सल्ला देण्यात आला आहे की, कार्यक्रमांसाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कामगारांना सन्मान देण्यासाठी कार्यक्रमात आमंत्रित करावे. ज्या लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर निरोगी झाले आहेत. अशा लोकांनाही कार्यक्रमांमध्ये बोलावले जाऊ शकते.