आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 15 Km Long Railway Tunnel; Rishikesh Karnaprayag Railway Project 2024 |Marathi News

ग्राउंड रिपोर्ट:रेल्वेचा 15 किमी लांब बोगदा; बद्रीनाथ धामचा 7 तासांचा प्रवास दोन तासांतच, ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प 2024 मध्ये पूर्ण होणार

डेहराडून | मनमीत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प वर्ष २०२४ मध्येच पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. १७ बोगदे, ३५ पुलांसह १२ रेल्वेस्थानकांचे अर्धे काम झाले आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक रेल्वेस्थानके पूर्णपणे भूमिगत असतील. रेल्वे मार्गाचा ९०% भाग बोगद्यांतूनच जातो. त्याबरोबरच देशातील सर्वात लांब १५ किलोमीटरच्या देवप्रयाग-लछमोली या रेल्वे बोगद्याच्या कामालाही वेग आला आहे.

रेल्वे विकास मंडळाचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक ओमप्रकाश मालगुडी यांनी सांगितले की, १२६ किलोमीटर लांबीच्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाच्या ९ टप्प्यांत एकूण ८० प्रवेशद्वारे असतील. कर्णप्रयाग रेल्वेस्थानक ऋषिकेश ते बद्रीनाथ धाम या मार्गावर आहे. सध्या रस्ते मार्गाने ऋषिकेश येथून कर्णप्रयागला जाण्यासाठी ७ तास लागतात. या रेल्वेमार्गामुळे या प्रवासाला फक्त २ तास लागतील, असा दावा रेल्वे विभागाने केला आहे. म्हणजेच बद्रीनाथ धामला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रवासासाठीचे ५ तास तर वाचतीलच, शिवाय खर्चही कमी होईल. एवढेच नव्हे तर पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते मार्ग खूप धोकादायक असतो. हा धोकाही या रेल्वेमार्गामुळे कमी होणार आहे.

फक्त एका बोगद्याचाच खर्च ३,३३८ कोटी रुपये
१५ किमीचा बोगदा तयार होत आहे. हिमालयीन भागांत हा सर्वात लांब बोगदा असेल. एल अॅँड टी कंपनी तो ३,३३८ कोटींमध्ये तयार करत आहे. सध्या सर्वात लांब रेल्वे बोगदा बनिहालमध्ये आहे, तो ११.२ किमी लांब आहे.

हिमालयात पहिल्यांदाच १० भूमिगत रेल्वेस्थानके
१६,२१६ कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गत ३५ पूल, १७ बोगदे, १२ रेल्वे स्थानके तयार होत आहेत. १० स्थानके बोगद्याच्या आत असतील. शिवपुरी आणि ब्यासी या स्थानकांचाच काही भाग खुल्या जमिनीवर असेल. रेल्वे मार्ग १२६ किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी १०५. ४७ किलोमीटरचा भाग भूमिगत असेल.

बातम्या आणखी आहेत...