आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 1.5 Lakh Crore Bid In 5 G Spectrum Auction, Reliance Jio Leads With Rs 88,078 Crore

स्पेक्ट्रम लिलाव:5-जी स्पेक्ट्रम लिलावात 1.5 लाख कोटींची बोली, रिलायन्स जिओ 88,078 कोटींसह आघाडीवर

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५-जी स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओने २४,७४० मेगाहर्ट‌्झ स्पेक्ट्रम ८८,७८ कोटींना विकत घेतले आहेत. जिओने अनेक बँडमध्ये स्पेक्ट्रम मिळवले. यात प्रतिष्ठित ७०० मेगाहर्ट‌्झ बँडचा समावेश आहे. तो ६-१० किमीची सिग्नल रेंज देऊ शकतो. देशातील सर्व २२ मंडळांमध्ये ५-जी सेवेसाठी हा एक चांगला आधार बनू शकतो. ७०० एमएचझेड वापरून टॉवर जास्त क्षेत्र व्यापू शकतो. सरकारने यावर्षी लिलावासाठी १० बँडमध्ये ४.३ लाख कोटींचे स्पेक्ट्रम ठेवले. २६ जुलैपासून लिलाव सुरू झाला.

सुनील भारती मित्तल यांच्या भारती एअरटेलने ५ बँडमध्ये १९,८६७.८ मेगाहर्ट‌््झ स्पेक्ट्रम ४३,०८४ कोटी रुपयांना विकत घेतले. व्होडाफोन आयडियाने १८,७८४ कोटींना ६२२८ मेगाहर्ट‌्झ स्पेक्ट्रम खरेदी केले. अदानी समूहाने २१२ कोटींना २६ जीएसझेड बँडमध्ये ४०० मेगाहर्ट‌्झ स्पेक्ट्रम विकत घेतला. ५-जी स्पेक्ट्रम लिलावात मिळालेले १,५०,१७३ कोटी २०१० नंतरच्या सात लिलावांपैकी सर्वाधिक आहेत.

बातम्या आणखी आहेत...