आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 15 Storms Brought Rain Till May For The First Time In 20 Years, Temperature Will Rise From May 15

छोटा उन्हाळा...:20 वर्षांत प्रथमच मेपर्यंत 15 वादळांनी आणला पाऊस, 15 मेपासून तापमान वाढणार

नवी दिल्ली |अनिरुद्ध शर्मा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात उन्हाळा साधारणपणे मार्च ते १५ जूनपर्यंत राहतो. या वेळी मार्चमध्ये ७ पश्चिमी विक्षोभ आले. यामुळे देशभरात ३७.६ मिमी पाऊस झाला. तो सरासरीपेक्षा (२९.९) २६% जास्त होता. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले. तर, एप्रिलमध्ये पाच पश्चिमी विक्षोभ आले. यामुळे वायव्य भारतात अनेक वेळा पाऊस झाला आणि तापमान कमी राहिले. एप्रिलमध्ये देशभरात ४१.४ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा (३९.३ मिमी) ५% जास्त होता. मध्य भारतात एप्रिलमध्ये साधारणपणे ९.२ मिमी पाऊस होतो. परंतु या वेळी ३० मिमी म्हणजे सरासरीपेक्षा २२६% जास्त पावसाची नोंद झाली. हवामान तज्ज्ञ आर.के. जेनामनी यांच्या मते जूनमध्ये कमी किंवा जास्त उष्म्याचा प्रश्न असला तरी आता काहीच सांगता येणार नाही. १ जूनला मान्सून केरळमध्ये धडकेल.

शेवटी पश्चिम राजस्थानमध्ये ८ जुलैपर्यंत पोहोचून संपूर्ण भारतात पसरतो. तोपर्यंत उष्णता राहू शकते. तथापि, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात एखादे वादळ निर्माण झाले तर मान्सूनपूर्व पावसाचा काळ येऊ शकतो. या काळात उष्णता कमी होऊ शकते. त्याची १ जूनपर्यंत चाहूल लागेल किंवा नाही, याची गणना सुरू असून १५ मेपर्यंत त्याचा अंदाज समोर येईल. मेचा पहिला आठवडा संपत आलाय. पण अजून खूप उष्णता आली नाही. या प्रकरणी, जर तुमच्या मनात प्रश्न असतील की असे का होत आहे? यंदा उष्णता जाणवेल की नाही? पाऊस किती दिवस राहणार? तर ही बातमी जरूर वाचा. भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी म्हणाले की, २८ एप्रिलपासून ते ४ मेपर्यंत सलग ३ सक्रिय आणि मजबूत पश्चिमी विक्षोभ आले. उन्हाळ्यात एकाच आठवड्यात एकापाठोपाठ ३ पश्चिमी विक्षोभ येणे ही गेल्या २० वर्षांतील दुर्मीळ घटना आहे. हिवाळ्याप्रमाणे या घटनांमुळे दिवसाच्या तापमानात १० ते १५ डिग्रीपर्यंत घट झाली.

स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, मार्चमध्ये ७, एप्रिलमध्ये ५-६ आणि मेमध्ये दोन पश्चिम विक्षोभ (पश्चिमी वादळ) आले. म्हणजे उन्हाळ्यात १५ प. विक्षोभ आले. अजून एक येणार आहे. यामुळे ३ ते ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. १५ मेनंतर तापमान वाढेल. जूनमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे दोन दशकांतील हा सर्वात लहान उन्हाळा ठरणार आहे.

हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे
हा पश्चिम विक्षोभ म्हणजे काय? त्यामुळे उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखे वातावरण असते.

प. विक्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स ही वादळे आहेत जी भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात हिवाळ्याच्या काळात येतात. जे भूमध्य समुद्र, अटलांटिक महासागर आणि काही प्रमाणात कॅस्पियन समुद्रातून वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये आर्द्रता आणते आणि उत्तर भारत, पाकिस्तान आणि नेपाळवर पाऊस आणि बर्फाच्या रूपात अचानक गळती करते.

अवकाळी पाऊस कधीपर्यंत?
७ ते ९ मेदरम्यान बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ उठेल. त्यामुळे पुढील ४ दिवस मध्य प्रदेश, बिहार, झारखंडसह अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ओडिशातील १८ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. मोचा ७ मे रोजी प. बंगाल व ओडिशात परिणाम दाखवेल.८ व ९ मे रोजी त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

मेमध्ये कडक ऊन पडणार की नाही किंवा तापमान कमी होणार?
१५ मेनंतर पारा वाढू शकतो. परंतु वायव्य भारतापासून ते मध्य भारतातील राज्यांत अनेक दिवसांपर्यंत उष्म्याच्या लाटेसारख्या घटना सामान्य उन्हाळ्यापेक्षा कमी होतील. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात किनारपट्टी, राजस्थान सीमेवरील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये उष्ण लाटेचे दिवस साधारण दिवसांपेक्षा जास्तही असू शकतात.

यंदा उष्मा कमी असल्याने मान्सूनच्या पावसावर काही परिणाम होणार की नाही?
मान्सूनच्या पावसावर १५ ते १६ घटकांचा प्रभाव आणि नियंत्रण असते.केवळ भारतीय भूपृष्ठावरील तापमानाचा मान्सूनशी थेट संबंध नाही. यंदा साधारण मान्सूनचा पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.