आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरमध्ये भीषण रस्ता अपघात:विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन बस उलटल्याने 15 जणांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी गंभीर जखमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. टूरवर जाणाऱ्या दोन स्कूल बस उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बस थम्बलनू उच्च माध्यमिक विद्यालयाची होती. बस खपूमकडे जात होती.

हा अपघात बिष्णुपूर-खौपुम रोडवर लोंगसाई तुबुंग गावाजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून मदत केली. जखमींना इंफाळ येथील मेडिसिटी रुग्णालयात नेण्यात आले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ओल्ड कछार रोडवर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसच्या अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी एसडीआरएफ, वैद्यकीय पथक आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

आम्ही झोपेत होतो, अचानक अख्खी बस पेटली

'आम्ही सर्व गाढ झोपेत होतो. अचानक बसची भीषण टक्कर झाल्याचे जाणवले. त्यामुळे सीटवरुन खाली कोसळले. समोर पाहते तर बसच्या पुढील भागाला आगीने वेढले होते. खिडकीतून उडी मारत कसाबसा जीव वाचवला.' नाशिक बस अपघातात वाचलेल्या अनिता सुकदेव चौधरी सांगत होत्या. नाशिकमध्ये आज खासगी बसच्या भीषण अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. जवळपास 50 प्रवासी असलेल्या या बसमध्ये सर्वाधिक प्रवासी यवतमाळ व जवळील जिल्ह्यांतील असल्याचे समोर आले आहे. या अपघातात वाचलेल्या प्रवाशांनी या भयंकर अपघातानंतर नेमके काय झाले, हे सांगितले आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

MP बस अपघाताचा अखेरचा VIDEO

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या एका भीषण बस अपघातात 13 जणांचा बळी गेला. महाराष्ट्र डेपोची ही बस इंदूरहून पुण्याच्या (अमळनेर) च्या दिशेने जात होती. पण रस्त्यात खलघाटलगत चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट दुथडी भरुन वाहणाऱ्या नर्मदा नदीत कोसळली. अपघाताच्या अर्धा तासापूर्वीचे CCTV फुटेज दिव्य मराठीला मिळाले आहे. त्यात इंदूरहून निघालेली बस अपघातस्थळापासून 5 किमी अगोदर मधूबन धाब्यावर थांबलेली दिसून येत आहे. येथे 10 मिनिटे थांबल्यानंतर ती एक टोलनाका ओलांडून पुलावर पोहोचते आणि थेट नर्मदेत कोसळले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...