आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्था स्थिर राहण्याचे संकेत:डिसेंबर महिन्यात 1.50 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीएसटी संकलनाच्या आकड्यांमुळे पुन्हा अर्थव्यवस्था स्थिर राहण्याचे संकेत मिळाले आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारे १५.२ टक्क्यांनी वाढून १.५० लाख कोटींहून अधिक झाले आहे. हे आतापर्यंतचे तिसरे सर्वाधिक जीएसटी संकलन आहे. यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये १.६८ लाख कोटी इतके विक्रमी संकलन झाले होते. नंतर सणासुदीच्या ऑक्टोबरमध्ये १.५२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले.

एक वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये १.२९ लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले होते. जीएसटी संकलन १.४० लाख कोटींहून अधिक असलेला डिसेंबर २०२२ हा लागोपाठ दहावा महिना ठरला. तर एकूणच अकराव्यांदा हा आकडा पार झाला आहे. अर्थ मंत्रालयाकडून रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये जीएसटी संकलन १,४९,५०७ कोटी रु. झाले.

बातम्या आणखी आहेत...