आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 16 Bangladeshis Arrested In Tripura; Suspected Of Links With Terrorists, Sent To Judicial Custody

घुसखोरांना अटक:त्रिपुरात 16 बांगलादेशी अटकेत; दहशतवाद्यांशी संबंधांचा संशय, न्यायालयीन कोठडीत रवाना

आगरतळा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरतळा येथील सुरक्षा दलाने एका घरातून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. ते दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय आहे. तूर्त त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे. राजनगरमधील एका घरात काही परदेशी दडून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलास मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तपास करत राजनगर निवासी राजीब मियाहच्या घरातून या घुसखोरांना अटक केली.

गेल्या १५ दिवसांपासून ते या घरात दडून बसले होते. घराचा मालक राजीब व्यवसायाने चालक आहे. त्याच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे. त्रिपुरात अनेक ठिकाणी बांगलादेशला लागून सीमेवर काटेरी कुंपण नाही. त्यामुळे या भागातून दहशतवादी घुसखोरी करतात. रेल्वे व इतर वाहनांनी ते देशातील इतर भागातही पोहोचू लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांत आसाममध्येही बांगलादेशी दहशतवादी संघटना अन्सारुल्ला बांगला टीम, अल कायदाच्या ४० पेक्षा जास्त जणांना अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...