आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत मोरारी बापूंनी ऑनलाइन कथेच्या माध्यमातून अयोध्येत राम मंदिर निर्माण कार्यासाठी ५ कोटी रुपयांची भेट देण्याची घोषणा केली होती. त्यांचा संकल्प पाहून भाविकांनी १६.८१ काेटी रुपयांचा निधी उभारला.
मोरारी बापू तलगाजरडा- भावनगरमध्ये ऑनलाइन कथा सांगत होते. मोरारी बापूंनी २७ जुलै रोजी कथेच्या मंचाहून पावनपुरी अयोध्येतील मंदिरासाठी भाविकांच्या सहकार्यातून ५ कोटी रुपये पाठवण्याचा संकल्प केला होता. मोरारी बापूंनी त्यासाठी स्वत: सुरुवात करत म्हटले की, तुलसीदलाच्या रूपात मी ठाकूरजींच्या चरणी रुपये अर्पण करतो. भाविकांकडून येणारे पैसे एकत्रित करून रामधनाच्या रूपात ते ५ ऑगस्टपूर्वी अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला पाठवले जातील. ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत त्यांना देशभरातून सुमारे १० कोटी रुपये मिळाले होते, असे मोरारी बापूंनी सांगितले. ३.५१ कोटी अमेरिका, कॅनडातून तर २.८० कोटी रुपये ब्रिटन तसेच युरोपातून रामधन मिळाले. पावन अयोध्यानगरीत भगवान रामाच्या भव्य मंदिराची तयारी सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.