आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 16 districts of assam besieged by floods hitting 253 lakh people brahmaputra reaches danger level

मुसळधार :आसामच्या 16 जिल्ह्यांना पुराचा वेढा; 2.53 लाख लोकांना फटका, ब्रह्मपुत्रेने धोक्याची पातळी आेलांडली

गुवाहाटी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरामुळे झालेल्या दुर्घटनांत १६ जणांचा मृत्यू

ईशान्येकडील राज्ये व हिमालयीन क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आसामच्या १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रेसह उपनद्यांनी धोक्याची पातळी आेलांडली आहे. पुरामुळे झालेल्या दुर्घटनांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुरामुळे राज्यात २.५३ लाख लोकांना फटका बसला आहे. धेमाजीशिवाय शिवसागर, तिनसुकिया, नागाव, गोलाघाट, जोरहाट, मजुली व डिब्रूगड जिल्ह्यांतील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. डिब्रूगड जिल्ह्यात २५ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. सहा जिल्ह्यांत १४२ तात्पुरते निवाऱ्याची व्यवस्था व वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पूरग्रस्त भागांत १८ हजारांहून जास्त लोक राहतात. आतापर्यंत १२ हजार हेक्टर भागातील शेतीची हानी झाली. पोबितोरा अभयारण्यात पाणीच पाणीच झाले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. येथील १०० गेंडे, १५०० जंगली म्हशी पर्वत भागांवर गेले आहेत. 

0