आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील ३ हजारांपेक्षा जास्त लाेक मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या खंगेला चेकपाेस्टवर अडकले असून यामध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. तहान व भुकेने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी गाेंधळ घातला. त्यांनी बस, पाेलिस वाहनांची ताेडफाेड केली. त्यानंतर पाेलिसांनी लाठीमार केला. तणाव लक्षात घेऊन गुजरात, मध्य प्रदेशने सुरक्षेत वाढ केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या लाेकांना आधार कार्ड बघून साेडले जात असून त्यांनाच अडवले जात असल्याचे बघून उत्तर प्रदेशच्या लाेकांचा संताप झाला. महाराष्ट्रातून घरी जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कामगारांसाठी दाेन दिवसांनंतर सीमा पुन्हा बंद केल्या.
पहिली कामगार विशेष गाडी दानापूरला पाेहोचली :
बिहारच्या १,१८७ कामगारांना घेऊन पहिली कामगार विशेष गाडी १६ तासांचा प्रवास करून शनिवारी दुपारी दानापूरला पाेहोचली. ही गाडी शुक्रवारी रात्री जयपूरवरून निघाली.
उत्तर प्रदेश, आेडिशासाठी ३ कामगार विशेष गाड्या
गुजरातवरून उत्तर प्रदेश,आेडिशाच्या कामगार प्रवाशांना नेण्यासाठी शनिवारी ३ कामगार विशेष गाड्या चालवण्यात आल्या. दाेन कामगार विशेष गाड्या अहमदाबादवरून उत्तर प्रदेश, एक सुरतवरून आेडिशासाठी रवाना झाली. महाराष्ट्रात ठाणे येथून गाेरखपूरसाठी रात्री विशेष गाडी चालवण्यात आली. केरळ येथून झारखंडसाठी विशेष गाडी साेडण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.