आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई भिडली आकाशाला:6 महिन्यांतच विमान भाड्यात दुपटीपर्यंत वाढ, हवाई इंधन दरात 16% वाढ

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई आता आकाशाला भिडली आहे. गुरुवारी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) म्हणजे हवाई इंधनाच्या दरात १६% वाढ झाली. दिल्लीत ते १९,७५७.१३/ किलोलिटरने महाग होऊन विक्रमी ~ १.४१ लाखांपर्यंत पोहोचले. या वर्षी ६ महिन्यांतच ११ वेळा दरवाढ झाली आहे आणि ते ९१% महाग झाले आहे. १ जानेवारीला हा दर ७६,०६२ रुपये होता.

वर्षातील दुसरी सर्वात मोठी वाढ
-स्पाइसजेटचे एमडी आणि चेअरमन अजय सिंह यांनी सांगितले की, एक वर्षात एटीएफ १२०% पर्यंत महाग झाले आहे. त्यामुळे हवाई भाडे किमान १०-१५% पर्यंत वाढू शकते.
-१६ मार्च २०२२ ला एटीएफच्या दरात १८.३% पर्यंत वाढ होऊन तो १.१० लाख रु. प्रति किलोलिटर झाला. तेव्हा प्रथमच तो १ लाखांच्या वर गेला होता.

खिशाला येथे बसणार झळ
विमानांच्या संचालनात ४०-५०% पर्यंत वाटा असलेल्या एटीएफचे दर वाढल्याने विमान भाड्यातही प्रचंड वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या ६ महिन्यांत अनेक विमानांचे किमान भाडे दुप्पट झाले आहे. आयआरसीटीसीनुसार, १६ जूनला भोपाळहून दिल्लीला जाण्यासाठी किमान भाडे ५,६६३ रुपये होते, तर जानेवारीत ते २,७०० रुपयांच्या आसपास होते.

हवाई इंधनावर दबाव

आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाची किंमत वाढल्याने हवाई इंधनावर दबाव आहे. जगातील सर्वात मोठे क्रूड ऑइल बेंचमार्क ब्रेंट गुरुवारी ११९.१६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले, जे गेल्या एक दशकाची सर्वोच्च पातळी आहे. दुसरीकडे, इंडिगोच्या प्रवक्त्याने ‘भास्कर’ला सांगितले की, इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळावा यासाठी एटीएफला जीएसटीच्या कक्षेत आणले जावे, अशी सरकारला विनंती आहे. अलीकडेच झारखंडने एटीएफवर व्हॅट २०% वरून घटवून ४% केला आहे, इतर राज्यांनीही असे केल्यास दिलासा मिळेल.

असा महाग झाला हवाई प्रवास
-जानेवारी २२ मध्ये दिल्ली-मुंबईचे किमान विमान भाडे ५,९५५ रु. होते, ते जून २०२२ मध्ये वाढून ८,३०० झाले आहे, म्हणजे 40 टक्के महाग.
-दिल्लीहून पाटण्याचे विमान भाडे जानेवारी 2022 मध्ये सुमारे 4500 रु. होते, ते जून 2022 मध्ये वाढून 6,800 रु. पर्यंत गेले म्हणजे 51 टक्के महाग.
-दिल्लीहून कोलकात्याचे विमान भाडे जानेवारी २२ मध्ये 5,960 रु. होते, आता त्यात वाढ होऊन ते 8,055 रु. झाले आहे म्हणजे ३५ टक्के महाग.

सुमारे ६०% वाटा एकट्या इंडिगोचा, गो फर्स्ट दुसऱ्या क्रमांकावर
मार्केट - शेअर - प्रवाशांची संख्या
इंडिगो - 58.9% - 64.11 लाख
गो फर्स्ट 10.2% 11.09 लाख
स्पाइसजेट 9.2% 10.01 लाख
विस्तारा 8.3% 9.04 लाख
एअर इंडिया 7.6% 8.26 लाख

-कोरोना काळाआधी म्हणजे २०१९ मध्ये इंडिगोचा बाजारातील वाटा 49.9%, एअर इंिडयाचा १४%, स्पाइसजेटचा १३% व गो फर्स्टचा १०.८% होता.

बातम्या आणखी आहेत...