आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लेसमेंट:कोविडच्या काळातही 248 जणांना 16 लाखांचे पॅकेज, आयआयटी बॉम्बे व आयआयटी खरगपूरमध्ये सर्वाधिक पॅकेज

जयपूर / दीपक आनंद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटी व आयआयएमची दोन सत्रे भलेही कोविड-१९मुळे प्रभावित झाली. परंतु, प्लेसमेंटवर मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. आयआयटी बॉम्बे व आयआयटी खरगपूरमध्ये सर्वाधिक पॅकेज एक कोटीहून अधिक राहिले. मात्र, प्लेसमेंट अहवालात याचा उल्लेख नाही. दुसरीकडे, लॉकडाऊनमुळे कन्सल्टन्सी वाढल्याने टॉप आयआयएममध्येही प्लेसमेंट चांगल्या राहिल्या. यामुळे सरासरी पॅकेज वाढले आहे. आयआयटी बॉम्बेच्या २४८ विद्यार्थ्यांना १६ लाखाहून अधिक पॅकेज ऑफर मिळाल्या. कोविडपूर्वीच्या ऑफरपेक्षा त्या अधिक आहेत. तर, २०२० मध्ये २४८ विद्यार्थ्यांना हे पॅकेज मिळाले होते.

आयआयटी दिल्लीने आपल्या सर्वाधिक पॅकेजची माहिती जाहीर केलेली नाही. आयआयटी मद्रासच्या प्लेसमेंट अहवालानुसार, २०२० मध्ये बी.टेक. विद्यार्थ्यास सर्वाधिक पॅकेज १.३३ कोटींचे होते. यंदा ते ६४.३ लाख आहे. मात्र, किमान व सरासरी पॅकेज कोविडपूर्व स्थितीपेक्षा चांगलेच वाढले. आयआयएम अहमदाबादमध्ये सर्वाधिक पॅकेजेस थोडे कमी मात्र, प्लेसमेंट संख्या कमी झालेली नाही. कलकत्ता, बंगळुरू या शहरांसह बहुतांश आयआयएमच्या विद्यार्थ्यांना यंदा मिळालेले पॅकेजस गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगले असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...