आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसाचा कहर:केरळमध्ये भूस्खलनामुळे आणखी 16 जणांचा मृत्यू; बिहारच्या डझनभर जिल्ह्यांत पाणीच पाणी

इडुक्कीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र केरळच्या कोटायम जिल्ह्यातील आहे. येथील बिशप हाऊसला पाण्याने वेढा दिला होता. त्यामुळे पादरींना बाहेर पडणेही कठीण झाले.

केरळमध्ये पूर, भूस्खलनाचा कहर सुरू आहे. इडुक्की जिल्ह्यातील राजमाला येथे तिसऱ्या दिवशी रविवारी भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून आणखी १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता मृतांची संख्या ४२ झाली आहे. मदत कार्य सुरू आहे. कोटायम जिल्ह्यात मीनाचिल, मणिमाला, मुवत्तुपुझा नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. मनारकडूमध्ये तरुण कारसह वाहून गेला. केरळ व शेजारी राज्यांत सोमवारी देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.

बिहार : डझनभर जिल्ह्यांत पाणीच पाणी

पाटणा । बिहारमधील १२ जिल्ह्यांना दोन आठवड्यांपासून पुराचा वेढा आहे. अनेक नद्या कोपल्या आहेत. अजूनही ६६ लाखांहून जास्त लोक पुरात अडकले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी भागलपूर, दरभंगा, पूर्णिया पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.

0