आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:आगामी हिवाळी अधिवेशनात 16 नवी विधेयके मांडणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार आगामी हिवाळी अधिवेशनात नवीन १६ विधेयके मांडण्याची तयारी करत आहे. त्यापैकी एक विधेयक निवडणूक प्रक्रियेच्या फेररचनेचे आहे. त्यात मतदानाबद्दल नागरिकांची जबाबदारी वाढवण्याचा मसुदा समाविष्ट आहे. हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

देशात राष्ट्रीय दंत आयोगाची गरज व्यक्त करणारे विधेयकही या अधिवेशनात मांडले जाणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय नर्सिंग विधेयकही आहे. मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज (दुरुस्ती) विधेयक २०२२ देखील पटलावर सादर केले जाणार आहे. यात प्रशासनाला बळकट करणे, पारदर्शकता वाढवणे, जबाबदारी वाढवणे, बँकिंग निवडणूक प्रक्रियेची फेररचना इत्यादी मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...