आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 17 Private Trains From Mumbai, 16 Private Trains From Delhi, Rs 30,000 Crore. Hope For Investment

प्रारंभ:मुंबईहून तब्बल 17, दिल्लीहून धावणार 16 खासगी रेल्वे, 30 हजार कोटी रु. गुंतवणुकीची आशा

शरद पांडेय | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशातून 6, राजस्थान-बिहारमधून प्रत्येकी 7-7, तर गुजरातमधून धावणार 2 रेल्वे
Advertisement
Advertisement

देशभरात १०९ मार्गांच्या १२ क्लस्टरमधून १५१ खासगी रेल्वे गाड्या चालवण्याची योजना आहे. यातील सर्वाधिक मुंबईतून १७ आणि दिल्लीतून १६ खासगी रेल्वे रोज विविध शहरांत धावतील. तसेच हावडाहून ९, मध्य प्रदेशातून ६, राजस्थान आणि बिहारमधून ७-७, गुजरात आणि झारखंडमधून प्रत्येकी २, हरियाणा आणि पंजाबमधून प्रत्येकी १ रेल्वे धावेल. ४५ रेल्वे दक्षिण भारतातील विविध शहरांमधून धावतील. यासाठी रेल्वे मंत्रालयाने रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन काढले असून ६ ते ८ महिन्यांत आर्थिक बोली लावली जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात सुमारे ३० हजार कोटींची खासगी गुंतवणूक होईल. 

प्रत्येक रेल्वेत कमीत कमी १६ कोच असतील. ट्रेनचे लोकोपायलट आणि गार्ड रेल्वेचेच असतील. सेफ्टी क्लियरन्सही रेल्वेच देईल. मुंबईतून जेवढ्या संख्येत खासगी रेल्वे जातील तेवढ्याच वेगवेगळ्या शहरांतून येतील. म्हणजे १७ रेल्वे जातील, तर १७ येतील, तर गुजरातमधून केवळ २ रेल्वे जातील, मात्र दुसऱ्या राज्यांतून ६ रेल्वे येतील. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार गुजरातमधून बाहेर जाणाऱ्यांच्या तुलनेत येणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे गुजरातहून येणाऱ्या रेल्वेंची संख्या जास्त आहे. दरवर्षी ८ ते ९ कोटी तिकिटे प्रतीक्षा यादीत असतात. हे लक्षात घेऊनच खासगी रेल्वे चालवल्या जात आहेत. या योजनेचा हेतू प्रवाशांना जागतिक पातळीवरील प्रवासाचा अनुभव देणे आहे.

महाराष्ट्रात विविध राज्यांमधून सर्वाधिक १७ रेल्वे येतील

महाराष्ट्र १७, दिल्ली ८, गुजरात ६, राजस्थान ६, बिहार ५, चंदिगड २, मध्य प्रदेश १, उत्तर प्रदेश ३, अमृतसर आणि भटिंडा १-१ रेल्वे येतील.

Advertisement
0