आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 17 Projects In The Country Ran Out Of Coal, Power Generation In Uttar Pradesh Fell By 72%

कोळसा संकट:देशातील 17 प्रकल्पांत कोळसा संपला, उत्तर प्रदेशात वीज उत्पादन 72% घटले

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोळसा संकट आणि विजेची तूट सुरू असताना राज्यांतील वीजनिर्मिती प्रकल्पांतील वास्तव समोर आले आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी प्राधिकरणाच्या मंगळवारच्या अहवालानुसार, अनेक राज्यांतील प्रकल्प निम्म्या क्षमतेनेही सुरू नाहीत. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील प्रकल्प क्षमतेच्या ७५ टक्के कमी वीजनिर्मिती करत आहेत. उत्तर प्रदेशात हे प्रमाण ७२ टक्के आहे.

मध्य प्रदेश व पंजाबमधील प्रकल्प ६४ टक्के कमी वीजनिर्मिती करत आहेत. गुजरातेत हेच प्रमाण ६० टक्के आहे. राजस्थान आणि झारखंडमध्ये स्थिती गंभीर आहे. या दोन्ही राज्यांत प्रकल्प निम्म्या क्षमतेनेच सुरू आहेत. हरियानात क्षमतेच्या ६६ टक्के वीजनिर्मिती होत आहे. दक्षिणेत कर्नाटकात क्षमतेपेक्षा ३८ टक्के कमी वीजनिर्मिती सुरू आहे. अहवालानुसार, देशातील १३५ प्रकल्पांपैकी १७ प्रकल्पांत एक दिवसाचाही कोळसा शिल्लक नाही. यांची एकूण क्षमता १६,४३० मेगावॉट असून ३४,९३० मेगावॉटची क्षमता असलेल्या २६ प्रकल्पांत एक दिवसापुरता कोळसा आहे. १७ प्रकल्पांत एक दिवस पुरेल इतकाही कोळसा नाही.

कोल इंडियाला पुरवठा वाढवण्याची केंद्राची सूचना
कोळसामंत्री प्रल्हाद जोशींनी म्हटले आहे की, २०-२१ ऑक्टोबरपर्यंत कोळशाचा पुरवठा १९.५ लाख टनांवरून वाढवून दररोज २० लाख टन एवढा केला जाईल. वीज उत्पादन कंपन्यांना कोळशाची कमतरता भासू दिली जाणार नाही. कोल इंडियाकडे २२ दिवसांचा साठा आहे. तथापि, सरकारने कोल इंडियाला पुरवठा वाढवण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...