आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 17 Thousand Feet High Peak Was To Be Encircled By Chinese Kava; China's Intentions To Breach The Security Cover

कारगिलसारखे षड‌्यंत्र:17 हजार फूट उंच शिखरावर घेरण्याचा होता चिनी कावा ;  सुरक्षा कवच भेदण्याचे चीनचे मनसुबे

नवी दिल्ली / मुकेश कौशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये १७ हजार फूट उंच शिखरावर कब्जा करण्याचा ३०० पेक्षा अधिक चिनी सैनिकांचा डाव होता. १९९९ च्या कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी लष्कराने हेच षड‌्यंत्र आखले होते. परंतु बहाद्दर भारतीय जवानांनी चिनी कावा वेळीच ओळखून त्यांना पिटाळून लावले.

संरक्षण खात्यातील सूत्रांनुसार या भागात गस्त घालताना चीनच्या पीएलएचे सैनिक प्रत्येक वेळी भारतीय जवानांच्या तुकडीच्या ‘सुरक्षा कवचा’ला सीमेपार ढकलण्याचा प्रयत्न करतात. ९ डिसेंबरनंतर या परिसरात आता नेहमीप्रमाणे गस्त सुरू आहे. तथापि, भारतीय लष्कर या परिसरात डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. चीनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वशक्तीनिशी त्याचा बीमोड करण्याचे आदेश लष्कराने दिले आहेत.

{ घुसखोरीचा पॅटर्न काय असतो ? चीन वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करतोय. सन २००६ ते २०१० या कालावधीत चीनी लष्कराने ३०० वेळा घुसखोरीचा प्रयत्न केला. २०१५ ते २०२० या दरम्यान घुसखोरीच्या घटना ३०० वरुन ६०० झाल्या. कब्जा मिळवून चीन नव्याने या भागातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. जगातील सर्वात लांब अन् वादग्रस्त सरहद्दीवर ७६ हॉट स्पॉट पश्चिम क्षेत्रात तर पूर्व भागात ७ हॉटस्पॉट आहेत. दोन्हीबाजूला घुसखोरीचा पॅटर्न पाहता चीनच्या विस्तारवादी धोरणाचे संकेत मिळतात. पश्चिम क्षेत्रातील घुसखोरी पूर्व भागातील घुसखोरीपेक्षा तीनपट अधिक आहे. २०२० मध्ये हा पॅटर्न पश्चिमच्या तुलनेत दहा पट जास्त होता. मध्य भागात अतिक्रमणांच्या घटना बाराहोती लष्करी तळाच्या आजूबाजूला केंद्रीत होत्या. पूर्व क्षेत्रात ६ रेड झोन आहेत आणि एक सिक्कीम आहे. यापैकी ५ मॅकमोहन रेषेजवळ आहेत. पश्चिम क्षेत्रात देपसांग,पेंगोंग,दमचौक,चुमुर,हॉट स्प्रिंग आणि गलवान यापैकी चार संवेदनशील भागात घुसखोरी अधिक होती. {तवांगमध्ये अतिक्रमणाचे सर्वाधिक प्रयत्न पूर्व सेक्टरच्या वादाचे ७ मुद्दे आहेत. सिक्किममध्ये सर्वाधिक ३० टक्के अतिक्रमण होत आहे. तवांगमध्ये २० टक्के, लुहन्जेमध्ये १० टक्के, बिशिंगमध्ये ५ टक्के, एनिनीमध्ये १० टक्के, किबितूमध्ये २५ टक्के घटनांची नोंद झाली.

संसदेत गदारोळ: संघर्षाच्या घटनेवरून मंगळवारी संसदेत विरोधकांनी गदारोळ केला. पंतप्रधान तथा संरक्षणमंत्र्यांना स्थितीवर बोलण्याची मागणी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, सरकारने आपली चूक लपवण्यासाठी स्पष्टीकरण दिले नाही. आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.

अरुणाचल सीमेवर हवाई गस्त : वायुदलाने एलएसीवर कॉम्बॅट एअर पेट्रोलिंग सुरू केली आहे. संघर्षापूर्वीही चीनने अरुणाचल सीमेत आपले ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता.

भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चिनी सैनिकांना पिटाळले ९ डिसेंबरच्या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. म्हणाले, ‘चिनी सैनिकांनी एलएसीवर अतिक्रमण करत ‘जैसे थे’ला एकतर्फी रूपात बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करण्यापासून रोखले व त्यांना त्यांच्या चौकीवर परत जाण्यास भाग पाडले. यात काही भारतीय सैनिक जखमी झाले, पण कुणाचाही मृत्यू झाला नाही.’ तिकडे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, चीन आणि भारतामधील सीमेवरील सद्यस्थिती सामान्यत: स्थिर आहे.

गृहमंत्री शहा म्हणाले... भारताच्या एक इंच जमिनीवरही चीनने कब्जा केला नाही. काँग्रेसने प्रश्नोत्तराचा तास चालू दिला नाही. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून १.३८ कोटी रुपये मिळाले. १९६२ मध्ये चीनने हजारो एकर जमीन हडपली. काँग्रेसने फाउंडेशनची एफसीआरए नोंदणी रद्दच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी सीमेचा मुद्दा उचलला.

बातम्या आणखी आहेत...