आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 177 Kashmiri Pandit Teachers Transferred To Safer Places; Initiatives Taken For Safety | Marathi News

खोऱ्यात दहशत:177 काश्मिरी पंडित शिक्षकांची बदली सुरक्षित ठिकाणी, शिक्षण संचालनालयाचा पुढाकार

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मिरात टार्गेट किलिंग व काश्मिरी पंडितांच्या पलायनादरम्यान पंतप्रधान पॅकेजअंतर्गत नियुक्त कर्मचाऱ्यांची सुरक्षित ठिकाणी बदली करण्याचा निर्णय झाला आहे. श्रीनगर शालेय शिक्षण संचालनालयाने शनिवारी १७७ शिक्षकांची बदली जिल्हा मुख्यालयाजवळ आणि अन्य सुरक्षित ठिकाणी केली. यातील सर्व काश्मिरी पंडित आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर ही सर्वात मोठी बदलीची यादी आहे.

१३ मे रोजी १९ कर्मचाऱ्यांची बदली जिल्हा मुख्यालयात झाली होती. त्यानंतर ५० शिक्षकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले होते. ग्रामीण विकास विभागाने ३ जून रोजी ३३ कर्मचाऱ्यांची बदली जिल्हा मुख्यालयात केली होती. राहुल भटच्या हत्येनंतर काश्मिरी पंडित सुरक्षित ठिकाणी बदलीची मागणी करत होते. सोबतच पती-पत्नीची ड्यूटी एकाच ठिकाणी किंवा एकाच जिल्ह्यात करण्याचीही मागणी होती. एक जून रोजी शिक्षण विभागाने अशा ९७ कर्मचाऱ्यांना स्थलांतरित केले. जिथे पती किंवा पत्नी ड्यूटीवर होते. काश्मिरात पीएम पॅकेजअंतर्गत ५९०० कर्मचारी आहेत. यापैकी बहुतांश शिक्षण विभागात आहेत.

अनंतनाग : चकमकीत ठार झाला हिजबुल अतिरेकी खांडे
अनंतनागमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कुख्यात अतिरेकी ठार झाला. निसार खांडे असे त्याचे नाव आहे. घटनास्थळावरून एके ४७ सह शस्त्रे व दारूगोळा हस्तगत केला. या चकमकीत तीन सैनिक व एक नागरिक जखमी झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...